सोलापूर - .प्रा.डॉ.बापूसाहेब आडसूळ संस्थापक प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य,सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई, सदस्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना साप्ताहिक विशाल क्रांतीच्या वतीने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रा डॉ बापुसाहेब आडसुळ यांनी आतापर्यंत शैक्षणिक सामाजिक व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल सदर पुरस्कार खासदार धैर्यशील दादा माने यांच्या शुभहस्ते इचलकरंजी येथे रविवार दिनांक 13.04.2025 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे.
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, मंगेश चिवटे विशेष कार्यकारी अधिकारी मुंबई मंत्रालय, प्रमुख उपमुख्यमंत्री वैद्यकीय साह्य कक्ष महाराष्ट्र राज्य,औदुंबरजी उकिरडे साहेब पुणे बोर्ड सचिव,मनीष काळजे जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर,सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर, कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक सोलापूर यांच्याबरोबर मंत्रालय मधील सर्व अधिकारी पुणे बोर्ड मधील सर्व अधिकारी यांनी आणि राज्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या समाजभूषण पुरस्काराबद्दल प्रा.डॉ.बापूसाहेब आडसूळ यांचे राज्यभरातून शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातून विशेष अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment