पूर्वोत्तरच्या सुंदर अतुल्य आणि मनमोहक संस्कृतीचा अनुभव घ्यावा - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, March 27, 2025

पूर्वोत्तरच्या सुंदर अतुल्य आणि मनमोहक संस्कृतीचा अनुभव घ्यावा

 





सोलापूर : देशाच्या विविध राज्यातील कला, वाद्य, नृत्य, खाद्य आणि वस्त्र संस्कृतीची ओळख आणि पूर्वोत्तर राज्यांची समृद्ध संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशानं ऑक्टेव-२५ सोलापूर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात पूर्वोत्तर ८ राज्यातील ३०० कलाकार त्यांच्या विविध रुपाने आपल्यासमोर सादरीकरण करतील, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्वोत्तरच्या सुंदर अतुल्य तथा मनमोहक संस्कृतीचा अनुभव घ्यावा,असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.






दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या भव्य पटांगणावर ऑक्टेव-२५ सोलापूर चं आयोजन करण्यात आलंय. बुधवारी, २६ ते २८ मार्च दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.







प्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज व कलासंस्कृतीचं प्रतिक नटराज यांच्या मूर्तीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पित करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते  दीप प्रज्वलन करून ॲक्टिव्ह 25 सोलापूर चं उद्घाटन करण्यात आले. यावेळी विभीषण चवरे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर, कुलकर्णी, प्रसन्न गोगाई, यांच्यासह दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.







या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्य गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपालसी .पी. राधाकृष्णन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ऑक्टेव _25 सोलापूर करिता शुभेच्छा पर ध्वनिफीत यावेळी उपस्थित त्यांना ऐकविण्यात आली.





पुढील तीन दिवस सायंकाळी ०६.३० वा. ते ०९.३० वा. या वेळेत पूर्वोत्तर राज्यातून तब्बल ३०० कलाकार आपल्यासमोर त्यांच्या लोक कलेची सादरीकरण करतील. फक्त लोकसंस्कृती ही नाही, त्यांच्या खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती, आणि त्यांचे संपूर्ण जीवनशैलीचा अनुभव घेण्याची आपल्याला संधी मिळणार आहे, असं जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगून, या ठिकाणी पूर्वोत्तर चे नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालया, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम, त्रिपुरा आदी आठ राज्यांचे स्टॉल्स पण उभे करण्यात आलेले आहेत. प्रदर्शन आणि खरेदीच्या माध्यमातून त्यांच्या संस्कृतीचा अनुभव घ्यावा, असंही त्यांनी यावेळी म्हटले.





आज जे नागरिक उपस्थित आहेत, त्यांनी आयुष्यात एक वेळ अवश्य पूर्वोत्तर राज्य फिरायला जा. शेवटी मी सर्व प्रेक्षकांना, आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना विनंती करतो की, आपण हा कार्यक्रमाचे माध्यमातून पूर्वोत्तरच्या सुंदर अतुल्य तथा मनमोहक संस्कृतीचे अनुभव घ्यावा, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सांगून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.







कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभीषण चौरे यांनी केले, त्यात महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने संस्कृतीच्या अदान-प्रदानासाठी सुरू असलेल्या प्रयत्न विस्तृतपणे मांडत या कार्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडवोकेट आशिष शेलार यांचं कौतुक केले, यावेळी आस्था कार्लेकर, प्रसन्न गोगाई यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या शुभारंभापूर्वी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.





कुमार आशिर्वाद यांनी केलं पूर्वोत्तर निसर्ग सौदर्याचं कौतुक 


मी २०१९ स्वतः सिक्कीम मिझोराम आणि मेघालय फिरलो आहे. एवढा सुंदर आणि एवढा निसर्गरम्य आहे. पूर्वोत्तर भागात एक वेळ गेल्यावर परत येण्याचं मन करत नाही. मी सहा दिवस ची सुट्टी घेऊन गेलो होतो. सहा दिवस संपल्यानंतर मी माझे वरिष्ठ विभागीय अधिकारी साहेबांना कॉल केला, अन् त्यांना विनंती केली की, चार दिवस पुन्हा मला सुट्टी वाढवून द्यावी, त्यांनी विनंती मान्य केली. 






चार दिवस संपल्यावर मी पुन्हा त्यांना कॉल केला आणि सांगितला की, मला अजून तीन दिवस ची सुट्टी द्यावी, अशी विनंती केली असता, त्यांनी सांगितले की, तीन दिवस नाही, आता तुम्ही तीस वर्षे सुट्टी घ्या आणि तिथेच तुम्ही राहा, तिथेच तुम्ही दुसरी नोकरी शोधून शटल होऊन जा, परत येण्याची शक्यता नाही, हे ऐकल्यावर त्यानंतर मी पटकन आलो,हा स्वाअनुभव उपस्थितांसमोर ठेऊन पूर्वोत्तर निसर्ग सौदर्याचं कौतुक करायला जिल्हाधिकारी विसरले नाहीत.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot