सोलापूर : हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे रविवार दि. ३० मार्च रोजी शहरात दोन ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे संस्थापक रंगनाथ बंग आणि उत्सव समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.
बाळीवेस शोभा यात्रापहिली शोभायात्रा बाळीवेस येथील विजयी चौकातून दुपारी ४.३० वाजता प्रारंभ होणार आहे. या शोभायात्रेत विशेष सजीव देखावा, भारतमाता प्रतिमा, एलईडीवर प्रयागराज महाकुंभ, श्री अयोध्या मंदीर, श्री मथुरा मंदिर आणि श्री काशी विश्वेश्वर मंदीर चित्रफीत दाखविली जाणार आहे. छत्रपति श्री शिवाजी महाराज, बाल श्री संभाजी महाराज आणि मावळे असा सजीव देखावा असणार आहे. देवतांची वेशभूषा केलेली आणि सजवलेल्या बग्गीत बसलेली मुले असणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी लाठी काठी प्रदर्शन, काटवे यांचे भरतनाट्यम सादर करण्यात येणार आहे. स्वामी यांचे रूद्र पठण, मारवाडी महिला मंडळ, पद्मशाली महिला मंडळ, पंचमुखी हनुमान मंदीर मुर्ती देखावा, आजोबा गणपती यांचे १०० जणांचे ढोल पथकही सहभागी होणार आहे. तसेच आकर्षक रांगोळीने सजावट केली जाणार आहे.
नववर्ष स्वागत शोभा यात्रेत अयोध्या येथील रामलल्लाचे दर्शनदा यंदाच्या च्या शोभायात्रेत सोलापूरकरांसाठी श्री अयोध्या येथील रामलल्ला मूर्तीचेही दर्शन होणार आहे. तसेच भारतमाता रथ आदींचा समावेश असणार आहे. ही शोभायात्रा बाळीवेस चौकातून प्रारंभ होऊन टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, नवीपेठ, पारसइस्टेटमार्गे शिवस्मारक पटांगणात विसर्जित होईल.
जुळे सोलापूर शोभायात्रा दुसरी शोभायात्रा जुळे सोलापूर परिसरातून काढण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता ही शोभायात्रा किल्लेदार मंगल कार्यालय येथून प्रारंभ होणार असून केएलई शाळेजवळ येथे समारोप होईल. दरवर्षीप्रमाणे हिंदू नववर्ष शोभायात्रेत हिंदू बंधू - भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन रंगनाथ बंग यांनी केले.
या पत्रकार परिषदेस उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, संस्थापक अध्यक्ष रंगनाथ बंग, कोषाध्यक्ष नितीन करवा, सचिव ज्ञानेश्वर म्याकल, प्रकाश कलकोटे, बाळीवेस शोभायात्रा प्रमुख चिदानंद मुस्तारे, जुळे सोलापूर शोभायात्रा प्रमुख जयदेव सुरवसे, महिला सांस्कृतिक प्रमुख ॲड. शर्वरी रानडे,
रविंद्र नाशिककर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment