'29 मार्च रोजी छत्रपतींच्या गडकिल्ल्यावर आधारित 'गडगर्जना ' महानाट्य - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, March 28, 2025

'29 मार्च रोजी छत्रपतींच्या गडकिल्ल्यावर आधारित 'गडगर्जना ' महानाट्य





सोलापूर - ऑक्टेव २५ या  तीन दिवसाच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दिनांक 29 मार्च रोजी याच रंगमंचावर 'गडगर्जना ' हे महानाट्य होणार आहे.   सांस्कृतिक कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याविषयी  माहिती देणारे महानाट्य सादर होणार आहे.  सांस्कृतिक कार्य मंत्री  यांच्या संकल्पनेतून पूर्व भारतातील कलाकार यांनी सादर केलेल्या संस्कृती सोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतिचे व इतिहासाचे दर्शन घडविणारे गडगर्जना या महानाट्याचे सादरीकरण दिनांक २९ मार्च रोजी होणार आहे. सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडगर्जना या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य  विभागाचे संचालक विभिषण चवरे  हे स्वतः  सर्व नियोजनवर लक्ष ठेऊन असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोनेरी इतिहास व वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक विभाग सदैव पुढाकार घेत असून सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

            





दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर,आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने            कालपासून पुढील तीन दिवस ऑक्टेव - 25 व सोबतच गडगर्जना हा कार्यक्रम चालणार आहे. पूर्वेत्तर राज्यांच्या नृत्य,कला,खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा तब्बल 300 कलाकारांचा  कार्यक्रम हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरआयोजित केला आहे .        

     




 'ऑक्टेव' च्या रंगमंचावरच गडगर्जना हे छत्रपती शिवरायांच्या  गडकिल्ल्यांविषयी  माहिती देणारे  महानाट्य व शाहिरी कार्यक्रम होणार आहे.२००  पेक्षा जास्त कलाकारांचा समावेश असलेला हे  महानाट्य सायंकाळी ६ते ९ या वेळेत होणार आहे. शिवकालीन गड - किल्ले, राजांच्या मोहिमा, शिवराज्याभिषेक आदी शाहिरी आणि नाट्यमय माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर सादर होणार आहे. छत्रपतींच्या शौर्यावर व पराक्रमावर आधारित या कार्यक्रमास जास्तीत जास्त तरुणांनी उपस्थिती दर्शवून महाराजांना अभिवादन करावे अशी विनंती श्री विभीषण चवरे यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot