प्रथम वर्षीच SP वक्तृत्व चषकचा मानकरी ठरला बासुतकर - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, March 28, 2025

प्रथम वर्षीच SP वक्तृत्व चषकचा मानकरी ठरला बासुतकर





सोलापूर - राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व शहर - जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष भाऊ पवार यांच्या नावाने SP वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांच्या वतीने करण्यात आले होते. सुरुवातीला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोस स्पर्धेतील पालकांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय, संतोष भाऊ तुम आगे बढो हम आपके साथ है,जुबेर भाई बागवान तुम आगे बढो हम आपके साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला.

    





पहिल्याच वर्षी स्पर्धेच्या घोषणेनंतर विद्यार्थी , पालक, शिक्षक , मुख्याध्यापक यांचा स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध १४ शाळेतील एकूण २५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.यामध्ये हिंगुलांबिका शाळा, राज मेमोरियल शाळा , सेंट थॉमस शाळा, स्वा द्वारकाताई देशपांडे , सोनामाता विद्यालय , सुधा मराठी विद्यालय, रामदास नरसय्या इप्पाकायल, वि.मेहता शाळा , गजानन विद्यालय , सहस्त्रार्जुन प्राथमिक , सिद्धार्थ मराठी शाळा, राजश्री शाहू मराठी विद्यालय, इंडियन मॉडेल स्कूल शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.मोहन होनमाने यांनी काम पाहिले. 

        






व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, माढा उदय कीर्ती अर्बन बँकेचे चेअरमन उदय माने ,अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी,परीक्षक प्रा.मोहन होनमाने,बाळासाहेब बिडकर, मनसेचे जेष्ठ नेते सुभाष माने, OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,  प्रज्ञासागर गायकवाड, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर यांची उपस्थिती होती.





यंदाचा संतोष भाऊ पवार वकृत्व चषकचा मानकरी हा हिंगुलांबिका शाळेतील विद्यार्थी प्रतीक बासुतकर हा ठरला .तर द्वितीय क्रमांक अनुश्री वड्डेपल्ली, तृतीय क्रमांक स्वराली लोंढे यांनी पटकाविला विजेत्या स्पर्धकांना रोख - रक्कम, ट्रॉफी ,  मिडल , प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व रोख देऊन गौरवण्यात आले.






प्रथम बासुतकर हा हिंगुलांबिका शाळेचा विद्यार्थी असल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयोजित SP वकृत्व स्पर्धेचा फिरता चषक सहभागी स्पर्धकास, पालकास,शिक्षक, मुख्याध्यापक यांना देऊन गौरवण्यात आले.






स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी उद्याचे उज्वल भविष्य आहे. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे. त्यांच्यात व्यासपीठावर बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे . बाल वयापासूनच त्यांच्यावर थोर महापुरुषांचे विचार आत्मसात होऊन त्या विचारांप्रमाणे त्यांनी विविध क्षेत्रात नावीन्य पूर्ण यश मिळवून आपले यशस्वी निश्चित ध्येय गाठावे .यंदाचे हे प्रथमच वर्ष २५ विद्यार्थ्यांचे नियोजन होते .पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांचे नियोजन करू असे जाहीर करत  या स्पर्धेचा मागचा उद्देश आयोजक वैभव गंगणे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात स्पष्ट केलं.






यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  उदय कीर्ती अर्बन बँकेचे चेअरमन उदय दादा माने यांनी त्यांच्या भाषणात थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करून  उद्या विविध क्षेत्रात चांगले वक्ते तयार होण्याच्या दृष्टिकोनातून वैभव गंगणे यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले विविध कलाकौशल्य सादरीकरण केले त्याचे विशेष कौतुक करत शाबासकीची थाप विद्यार्थ्यांना दिली. व स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांना प्रत्येकी १० वह्या देणार असल्याचे सांगत भाषणास पूर्णविराम दिला.





यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाज घटकांचे राजे होते.त्यांनी सर्व समाज घटकाला सोबत घेऊन रयतेचे रक्षण केले.त्यांचे विचार ,कार्य याची माहिती विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावी त्यातून उद्याचे नवनवीन उत्कृष्ट असे वक्ते तयार व्हावेत . विविध क्षेत्रात स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी नाव लौकीक करावे. स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक वैभव गंगणे यांनी समाजात हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे.आमही सर्वजण वैभव गंगणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ८०% समाज कारण आणि २०% च राजकारण हे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या विचारानुसार वैभव गंगणे हे नेहमी विविध माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.त्याचाच एक हा भाग आहे .यापुढे देखील अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम वैभव गंगणे यांनी आयोजित करावे त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व विजेत्या सर्व स्पर्धकांचे सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन , विशेषतः पालकांचे, शिक्षकांचे ,मुख्याध्यापकांचे अभिनंदन त्यांनी मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त केल्या.




कार्यक्रमाचे उक्तृष्ट सूत्र संचालन निवेदक मंगेश लामकाने यांनी तर आभार अल्पंख्यक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख यांनी मानले....

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot