सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत रविवारी विडी घरकुल येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शहर उत्तर पूर्व मंडल मधील प्रभाग क्रमांक १, २, ९, १०, ११ येथे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विडी घरकुल परिसरातील मंदिर, हॉस्पिटल, शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच बूथ यात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून संवाद करण्यात आला. याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते, आणीबाणीच्या काळातील मिसाबंदीतील कार्यकर्ते तसेच कारसेवकांचा सन्मान केला.
हे अभियान शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, अनिल कंदलगी, उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, प्रकाश म्हंता, गंगाधर बंडगर, भीमाशंकर लोहार, शेखर इगे, रुचिरा मासम, भास्कर मरगल तसेच सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment