सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य युवराज मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदना देण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य युवराज मेटे यांनी अध्यक्षीय मनोगतातून महाराष्ट्राच्या निर्मितीला उजाळा देत महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले त्यासोबत कामगारांच्या न्याय हक्काच्या सन्मानासाठी असणाऱ्या कामगार दिनाचा इतिहास सांगितला.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका कविता गेंगाणे यांनी केले.
No comments:
Post a Comment