Swarajya News Marathi : राष्ट्रवादी

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label राष्ट्रवादी. Show all posts
Showing posts with label राष्ट्रवादी. Show all posts

Thursday, May 1, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र दिनी ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं दिल्या शुभेच्छा

May 01, 2025 0

 


सोलापूर - १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथील विमानतळावर भेट घेऊन कामगार चळवळींमध्ये सर्वात मोठे योगदान असणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे माझी आत्माकथा पुस्तक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावरील फकीरा पुस्तक भेट देत गुलाब पुष्प देऊन ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.







 याप्रसंगी माणिक कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचा राज्य म्हणून ओळखला जात आहे शेती, उद्योग,व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचे घोडदौड कायम सुरू आहे महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा आपण दृढनिश्चय करूयात असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Read More

कष्टकरी असंघटित कामगारांचा जागतिक कामगार दिनी सन्मान

May 01, 2025 0

 



सोलापूर - १ मे कामगार दिनाचे अवचित्य साधून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व असंघटित कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर  बागवान यांच्या शुभहस्ते सोलापूर शहरातील कष्टकरी असंघटित बांधकाम कामगार यांचा फेटा बांधून गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मोदी येथे आनंदी वातावरणात संपन्न झाला.

     





व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, शहर सरचिटणीस कुमार जंगडेकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, OBC सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, प्रज्ञासागर गायकवाड , तर सचिव दत्तात्रय बनसोडे यांची उपस्थिती होती.





  यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपस्थित कामगार वर्गास शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाचे शहराध्यक्ष मार्तंड शिंगारे व कार्याध्यक्ष संजय सांगळे यांनी आयोजित केला होता.



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश पल्लारे, गोपाळ आरगोट,अशोक गोविंद्लू,सोमनाथ साखरे , श्रीकांत टोणपे यांनी अथक परिश्रम घेतले.

Read More

संयुक्त महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने ध्वजारोहण

May 01, 2025 0

 



सोलापूर - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आज संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना आणि महाराष्ट्रप्रेमींना अभिमान आहे महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जाते महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व महाराष्ट्रवीरांना आदरांजली अर्पण करत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत राष्ट्रवादीच्या वतीने  राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

 




महाराष्ट्र गौरव गीत  झेंडावंदन गीत आणि राष्ट्रगीताने सेवादलच्या वतीने सलामी देण्यात आली या ध्वजारोहणाचे संचलन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले..


 


याप्रसंगी शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर ,युवती अध्यक्ष किरण माशाळकर ,अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख ,कार्याध्यक्ष संजय मोरे ,सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी ,OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद ,कार्याध्यक्ष आयुब शेख, VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले ,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी ,वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख ,युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे ,सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे ,सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज अबादीराजे ,दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे ,कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर ,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे प्रज्ञासागर गायकवाड,शहर सरचिटणीस श्यामराव गांगर्डे ,सचिन घोडके, अर्चना दुलंगे ,सुरेखा घाडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या  एकजूटीच्या बळावर आपण महाराष्ट्राला अधिक वेगानं प्रगतीच्या वाटेवर नेऊया, असा दृढ संकल्प करूया. आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या तसंच जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो- संतोष पवार जिल्हाध्यक्ष 

Read More

Wednesday, April 30, 2025

नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य

April 30, 2025 0



सोलापूर - सोलापूर महानगरपालिका नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूची विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरविणे २०२४-२५ अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड आणि किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २२ येथील लिमयेवाडी व अंतर्गत परिसरात १९ लाख ४८ हजार ६३९ रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले. 






ड्रेनेज लाईन उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, नितीन जाधव, दीपक जाधव, किशोर जाधव,अनिल गायकवाड, अशोक पुजारी जाधव, प्रवीण जाधव, बाळकृष्ण जाधव, अनुप उपाडे, अंबादास गायकवाड, शिवा जाधव, सिद्धार्थ जाधव,कमलाबाई गायकवाड,रेश्मा जाधव, सुनीता मावशी,भाग्यलक्ष्मी ताई,गंगुबाई जाधव,रेखा जाधव, सोनाली जाधव, नसरीन पटेल, रसिका कसबे,सुरेखा गायकवाड, सरस्वती गायकवाड, ज्योती गायकवाड, स्नेहल जाधव, सरिता शर्मा, रेणू गायकवाड, मंगल गायकवाड, विद्या डेविड, गीता जाधव, कोमल उपाडे, गंगाबाई उपाडे, लता जाधव, अनिता माने, नयुमा शेख,रमजान शेख, जुबेदा शेख, मदिना शेख,सुधा गायकवाड, अंबाबाई जाधव आदींच्या उपस्थितीत या ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला.







दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की प्रभाग क्रमांक २२ येथील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि  ड्रेनेज कामामुळे परिसरातील आरोग्य आणि स्वच्छता निश्चितच सुधारणार आहे या विकास कामासाठी सहकार्य करणाऱ्या प्रभागातील रहिवाशांचे आभार सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच आज या कामाचा शुभारंभ होत आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली. 






या ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यावर या परिसरातील सांडपाण्याची योग्य व्यवस्था होणार असून प्रभाग क्रमांक २२ येथील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येणार आहे या विकास कामामुळेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी किसन जाधव म्हणाले. या ड्रेनेज लाईन शुभारंभ प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

Tuesday, April 29, 2025

संयुक्त महाराष्ट्र दिनानिमित्त निघालेल्या यशवंत हरित ज्योतचे सोलापुरात स्वागत

April 29, 2025 0

 


सोलापूर - संयुक्त महाराष्ट्राच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त कृषी सहकार औद्योगिक क्रांतीची यशवंत हरित ज्योत पुसद नांदेड येथून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. तेथून ही यात्रा बाबळगाव , निलंगा सांगली, प्रीतीसंगम शक्ती स्थळ यशवंतराव चव्हाण समाधी कराड ते हुतात्मा चौक मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या हस्ते ज्योत समारोप होणार आहे . या यशवंत हरित ज्योतचे प्रज्वलन कृषिभूषण गोविंदराव पवार यांनी नियोजन केले आहे . ही यशवंत हरी ज्योत सोलापुरात दाखल झाली असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे  यशवंत हरित ज्योतला शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर ज्योत घेऊन येणारे कृषिभूषण गोविंदराव पवार यांचे सहकारी हनुमंतराव कांबळे, रवी पवार , सुभाष कांबळे यांचा फेटा परिधान करून पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.





याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख,सरचिटणीस श्यामराव गांगर्डे, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे, सचिन घोडके ,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज अबादीराजे, सेहवाग उपस्थित होते...

Read More

वैद्यकीय मदत पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी ज्योतिबा गुंड तर शहराध्यक्षपदी बसवराज कोळी

April 29, 2025 0

 





सोलापूर :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी ज्योतिबा गुंड आणि सोलापूर शहराध्यक्षपदी बसवराज कोळी यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जितेंद्र सातव व महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य प्रवक्ते उमेश (दादा) पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या.






शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुकाध्यक्षांच्याही निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे : सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रमेश शिंदे, मोहोळ तालुका संपर्कप्रमुख महेश शिंदे, सांगोला तालुका अध्यक्ष अजय उबाळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री विक्रम गायकवाड, माढा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, सांगोला शहर अध्यक्ष बापूसाहेब देवकते, महूद (ता. सांगोला) आरोग्य विभाग अध्यक्ष विनय पवार, मोहोळ तालुका अध्यक्ष सारंग गायकवाड, मोहोळ तालुका उपाध्यक्ष धनराज चंदनशिवे.






यावेळी मुख्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कामांविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी वैद्यकीय मदत पक्षाचे प्रदेश संपर्कप्रमुख सचिन सरवदे, व्हीजेएनटी सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे, शहराध्यक्ष रुपेशकुमार भोसले, उपाध्यक्ष कुणाल धोत्रे, गणेश छत्रपती, शशिकांत डोलारे, संकेत माने, नकुल धवन उपस्थित होते.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot