Swarajya News Marathi : रेल्वे

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label रेल्वे. Show all posts
Showing posts with label रेल्वे. Show all posts

Sunday, May 11, 2025

केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी गणेश डोंगरे

May 11, 2025 0





सोलापूर- खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य व सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती (झेडआरयूसीसी) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र मध्य रेल्वे चे उपमहाप्रबंधक कुश किशोर मिश्र यांनी दिले.






देशातील रेल्वे झोनपैकी महत्वपूर्ण असलेल्या मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई हे असून या अंतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर व भुसावळ ये विभाग येतात. रेल्वे विभाग राष्ट्रीय, झोनल आणि विभाग पातळीवर अशा सल्लागार समिती स्थापन करीत असते रेल्वे बोर्डाककडून या समितीच्या नियुक्ती करण्यात येतात. प्रवासाच्या अडचणी,त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा या बाबत निर्णय घेणारी ही समिती आहे.मध्य रेल्वेसाठी झोनल रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती ( ZRUCC )  जी रेल्वेच्या वापरकरत्याचे प्रतिनिधित्व करते.






या निवडीनंतर गणेश डोंगरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले. येणाऱ्या काळात प्रवाशाच्या सुखसुविधा व रेल्वेच्या प्रगतीसाठी सातत्याने कृतिशील कार्य करण्यासाठी प्रयन्तशील राहणार असल्याचे म्हटले आहे.मला दिलेली जबाबदारी सकारात्मक काम करत पार पाडेन.






या निवडी बद्दल देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, सोलापूर बाजार समिती संचालक सुरेश हसापुरे, नगरसेवक विनोद भोसले,सचिन गुंड यांनी अभिनंदन केले.

Read More

Monday, May 5, 2025

५ मे पासुन पुण्याहून हुतात्मा एक्स्प्रेस सुटण्याच्या वेळत बदल

May 05, 2025 0




सोलापूर - मध्य रेल्वेने खाली दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२१५७ पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस जी पुण्याहून सोलापूरकडे रवाना होते, ती तीच्या निर्धारीत वेळेच्या ५ मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे:


गाडी क्रमांक १२१५७ पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस


विद्यमान वेळा: पुणेहून १७:५५ वाजता सुटत होती


सुधारित वेळा: दिनांक ०५.०५.२०२५ पासून, पुणे स्थानकांहुन १७:५० वाजता सुटेल,


मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.

प्रवाशांनी कृपया सुधारित वेळेची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

Wednesday, April 30, 2025

या विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवांची कालावधी वाढवणार

April 30, 2025 0





सोलापूर - मध्य रेल्वे दिलेल्या तपशीलांनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढवणार आहे. ते खालीलप्रमाणे





१. गाडी क्रमांक 01435 सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष, जी पूर्वी दि. २९ एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०६.०५.२०२५ ते दि. २४.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे. (८ सेवा)


गाडी क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर साप्ताहिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०७.०५.२०२५ ते दि. २५.०६.२०२५ पर्यंत  वाढवण्यात येत आहे. (८ सेवा)





२. गाडी क्रमांक 01461 सोलापूर ते दौंड जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. १.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत  वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)


गाडी क्रमांक 01462 दौंड जंक्शन ते सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत  वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)






३. गाडी क्रमांक 01465 सोलापूर ते कलबुरगि जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती  दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)


गाडी  क्रमांक 01466 कलबुरगि जंक्शन ते सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती  दि. ०१.०५.२०२५ ते दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)






४. गाडी क्रमांक 01024 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) - पुणे, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ ते दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)


गाडी क्रमांक 01023 पुणे ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर), जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ ते दि. ३०.०६.२०२५ पर्यंतवाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)






५. गाडी क्रमांक 01211 बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष, जी  पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती  दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)


गाडी क्रमांक 01212 नाशिक रोड ते बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)






६. गाडी क्रमांक 01487 पुणे ते हरंगुळ, जी पूर्वी दि. ३० एप्रिल २०२५ पपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०१.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)


गाडी क्रमांक 01488 हरंगुळ ते पुणे, ही गाडी दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. १.०५.२०२५ पासून दि. ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (६१ सेवा)





७. गाडी क्रमांक 01091 खंडवा जंक्शन ते सनावद अनारक्षित विशेष गाडी, जी आधी दि. २९ एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती  ०२.०५.२०२५ पासून ३०.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (४४ सेवा)


गाडी क्रमांक 01092 सनावद ते खंडवा जंक्शन अनारक्षित गाडी, जी आधी दि. २९ एप्रिल २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दि. ०२.०५.२०२५ पासून २४.०६.२०२५ पर्यंत वाढवण्यात येत आहे.  (४४ सेवा)





 *सुधारित संरचना -* गाडी  क्रमांक 01023 (कोल्हापूर - पुणे) साठी दि. ०४.०६.२०२५ आणि 01024 (पुणे - कोल्हापूर) साठी दि. ०५.०६.२०२५ पासून

तृतीय एक वातानुकूलित, ०७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरल व्हॅन.




वर नमूद केलेल्या ट्रेनच्या वेळेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.





*आरक्षण* : विशेष गाड्या क्रमांक 01435, 01436, 01024, 01023, 01487 आणि 01488 च्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३० एप्रिल २०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू आहे.





या विशेष गाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करा.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot