Swarajya News Marathi : सामाजिक

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Friday, May 2, 2025

कुचन प्रशालेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

May 02, 2025 0

 




सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य युवराज मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदना देण्यात आली.






याप्रसंगी प्राचार्य युवराज मेटे यांनी अध्यक्षीय मनोगतातून महाराष्ट्राच्या निर्मितीला उजाळा देत महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले त्यासोबत कामगारांच्या न्याय हक्काच्या सन्मानासाठी असणाऱ्या कामगार दिनाचा इतिहास सांगितला.






या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका कविता गेंगाणे यांनी केले.

Read More

Thursday, May 1, 2025

अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग सदाबहार संपन्न

May 01, 2025 0

 



सोलापूर-  महात्मा बसवेश्वर महामंडळ, विजापूर रोड आणि जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने   ओम गर्जना चौक,सवेरा नगर सैफुल येथे बसव जयंतीनिमित्त आयोजित एका विशेष व्याख्यान आणि जीवनगौरव -सन्मान समारंभाचे प्रथम श्रेणीचे सरकारी कंत्राटदार परमानंद अलगोंडा पाटील यांनी बसवण्णाच्या प्रतिमेला प्रार्थना करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जागतिक लिंगायत महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. 






व्यासपीठावर माजी आमदार शिवशरण पाटील, डॉ. शरणबसव हिरेमठ, शिक्षक नेते सूर्यकांत भरले व वीरभद्र यादवाड , शासकीय कंत्राटदार रेवणसिद्ध बिज्जरगी, चन्नबसप्पा गुरुभेट्टी, जागतिक लिंगायत महासभाचे अध्यक्ष शिवानंद गोगाव ,माजी विस्तार शिक्षणधिकारी अशोक भांजे,  सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण चलगेरी, नामदेव फुलारी, महिला अध्यक्षा राजेश्री थलंगे,आदी उपस्थित होते.              







शंकरलिंग महिला मंडळ आणि जागतिक लिंगायत महासभेच्या महिला सदस्यांनी सादर केलेल्या 'अनुभव मंडपा'मधील अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग ने लक्ष वेधून घेतले.माता अक्का महादेवी यांची भूमिका राजश्री थंळगे यांनी साकारली. महानयोगी अल्लमप्रभू, शिवयोगी सिद्धारमेश्वर ची भूमिकासह 40 महिला कलाकारांनी ने अप्रतिम अभिनय सादर केले. व उपस्थिताचे मने जिकंली.            






व्याख्यानाचे पहिले पुष्प 'बसवण्णांच्या विचारांमधून सामाजिक एकता' या विषयावर व्याख्यान गुमफतांना आज सर्वत्र अशांतता आहे. घरे आणि मनं दुःखाची कुंडं बनत चालली आहेत. मुले संस्कृतीपासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाने आपल्या जीवनात शरण संस्कृती अंगीकारण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या मुलांना बसवण्णा आणि शरणं यांचे वचन व त्यांचा अर्थ शिकवला तर ते आयुष्यात कधीही भरकटणार नाहीत, असे लातूरचे डॉ. भीमराव पाटील यांनी सांगितले. आजची मुले आणि तरुण शहाणे आहेत. ते म्हणाले की, ते शिक्षणाचे कोणतेही क्षेत्र असो, ते वैद्यकीय असो किंवा अभियांत्रिकी, जर त्यांना व्यावसायिक शिक्षणासोबतच शरणची तत्वे आणि वचने शिकवले तर ते आयुष्यात यशस्वी होतील. 






दुसरे पुष्प व्याख्याते डॉ. बी. बी. पुजारी यांनी "सांस्कृतिक नायक बसवण्णा" यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, बसवण्णा हे जगातील एक महान तत्वज्ञानी होते. ते फक्त एका राज्याचे सांस्कृतिक नायक नाहीत. संपूर्ण विश्वाचे नायक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार समजून घेणे आणि ते आज आपल्या जीवनात लागू करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.






कार्यक्रमास दासोह केलेले बसवेश्वर हॉटेलचे मालक चन्नाबसप्पा गुरुभेट्टी आणि जयश्री गुरुभेट्टी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खसगी, सचिव नागेंद्र कोगनुरे,  युवक अध्यक्ष शिवराज कोटगी, अक्कलकोट तालुकाध्यक्ष सचिन कालीबत्ती, सोलापूर अध्यक्ष डॉ.बसवराज नांदर्गी, शशिकला रामपुरे, उ.सोलापूर अध्यक्ष उमेश कल्याणी, वागदरी अध्यक्ष शरणप्पा मंगाणे , बसवराज आलुरे आदी उपस्थितीत होते. 







कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र हौदे, राजशेखर लोकापुरे आदींनी परिश्रम घेतले. मीनाक्षी बागलकोट आणि मीनाक्षी थलंगे  वचन गायले. अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक केले. शिक्षक सुरेश पीरगोंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तर रमेश येणेगुरे आभार मानले.






या मान्यवरांचे जीवन गौरव सत्कार 

सिद्धराम गुरुभेट्टी, परमानंद अलगोंडा, शिवानंद भरले, अमर पाटील, काशिनाथ भतकुनकी, तुकाराम कुदळे, शिवलीला गुड्डोदगी, इंदुमती हिरेमठ, भाग्यश्री सोडगी, गुरुबाळ बगले, संतोष हरकरे. मान्यवरांनी त्यांना बसवांची मूर्ती आणि विभूती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

Read More

Wednesday, April 30, 2025

गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवसा निमित्त स्टॉलचे उदघाटन

April 30, 2025 0



सोलापूर - 30 एप्रिल 2025 हा दिवस राज्यात गोमय उत्पादन विक्री दिवस साजरा करावयाचा आहे. यामध्ये  पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गोमय मुल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस आदर्श कामधेनु संशोधन संस्था संचलित कट्टेव्वादेवी गोशाळेचे गोमय उत्पादन विक्री  स्टॉलचे उद्घाटन समारंभ  मा. आमदार सुभाष देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी केतनभाई शहा (भारतीय जैन संघटना राज्य अध्यक्ष), गोशाळेचे अध्यक्ष उमा बिराजदार, रुद्रप्पा बिराजदार, केमचे श्री परमेश्वर तळेकर ,येवले, (सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त) ह.भ.प. अभिमन्यू डोंगरे महाराज जिल्हाध्यक्ष  विश्व हिंदू परिषद, सोलापूर.) महेश भंडारी, (अध्यक्ष, सोलापूर गोसेवा महासंघ) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. 






या वेळी गोभक्त, गोसेवक, गोरक्षक उपस्थित राहून गोमातेच्या गोशाळांनी सहभाग नोंदवला नजीकच्या एसटी बस स्थानकावर दिनांक 30.04.2025 रोजी पूर्ण दिवसभर त्यांच्याकडील गोमय उत्पादनाचा (स्टॉल) लावायचा आहे. त्याची प्रसिद्धी व विक्री करून उत्पादने किती चांगली आहे याबाबत स्थानकावर आलेल्या प्रवाश्यांना सविस्तर माहिती द्यावयाची आहे. सदर बाब केल्याने गोमय उत्पादनांची उत्कृष्ट अशी प्रसिद्धी होईल व गोशाळेला अर्थाजन होण्यास मदत होईल व त्या मुळे भाकड गोवंश हे कत्तलखान्या मध्ये जाणार नाहीत,तसेच शेतकरी सुद्धा आपले गोवंश हे कसाईना विकणार नाही,,

Read More

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त जी.एम संस्थे तर्फे सामुदायिक बुद्ध वंदन घेऊन अभिवादन

April 30, 2025 0

 



 सोलापूर - जगत ज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वर चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जी.एम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख व सामाजिक कार्यकर्ते जी.एम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन दीप प्रज्वलित करून समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 







या प्रसंगी बोलताना जी.एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की  12व्या शतकातील, महान संत, जगदज्योति, समतानायक, महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंटप नावाचे व्यासपीठ तयार करून या व्यासपीठाच्या साह्याने  कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माची मुक्तता करण्यासाठी तसेच त्याला व्यवहारिक  व लोकशाही विश्वधर्माचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं  त्या काळी धार्मिक, सामाजिक, आर्थिक जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली त्याचप्रमाणे जातीभेद व अनिष्ट रूडी परंपरेला कडाडून विरोध केला 





आशा हया महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था  संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते जीएम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आप्पासाहेब गायकवाड नरेंद्र शिंदे कुंदन वाघमारे नरेश कदम अजय कोळेकर मॅडी दुपारगुडे यशपाल कांबळे निहाल क्षीरसागर नंदकुमार चंदनशिवे आदी पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.




जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आदी.

Read More

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आमरस व पुरणपोळीचा मिष्टान्न भोजन

April 30, 2025 0





सोलापूर : आस्था रोटी बँकेने अक्षय तृतीयानिमित्त सोलापूर शहरात माणुसकीचा सुवास पसरविणारे विविध कार्यक्रम आयोजित केले. प्रारंभी भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रामचंद्र तडवळकर, डॉ जानवी माखीजा, लक्ष्मीकांत बिराजदार यांची उपस्थिती होती.




तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खास आमरस आणि पुरणपोळीच्या मिष्टान्न भोजनाची मेजवानी उभारली गेली. रुग्णांच्या तणावग्रस्त चेहऱ्यांवर समाधानाचा हास्यफुलारा फुलला. "सणाच्या दिवशी घरापासून दूर असूनही, इथे घरचीच ऊब मिळाली," अशा भावना व्यक्त करत भावुक नातेवाईकांनी फाऊंडेशनचे आभार मानले.






या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात, कुमठा नाका रोडवरील भारतमाता नगरीत राहणाऱ्या महिला कुष्ठरोगी वर्गासाठीही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वादिष्ट मिष्टान्न भोजनानंतर, अध्यात्मिक आधार देणाऱ्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन झाले. गवळी वस्तीतले ह. भ. प. अरुंधती महाराज भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय साध्या, रोजच्या जीवनातील उदाहरणांनी स्फुर्ती देणारे कीर्तन सादर केले.





समाजाकडून दूर लोटलेल्या या महिलांना आजवर टीव्हीवरच पाहिलेल्या कीर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्याची इच्छा असूनही शारीरिक व्यंगांमुळे त्यांना हे शक्य झाले नव्हते. मात्र आज, त्यांच्या गुमनाम दुनियेत आनंदाचा दीप उजळला. डोळ्यांत पाणी, ओठांवर हसू आणि मनात कृतज्ञता — असा अनोखा सोहळा या महिलांनी अनुभवला.






आस्था फाऊंडेशनने केलेल्या या उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेमाचा, स्नेहाचा आणि आस्थेचा हात पोहचविला.




कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय छंचुरे, नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, संपदा जोशी, अनिता तालीकोटी, राधा मॅडम, मंगल पांढरे, अविनाश मार्चला, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केले. 




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले, तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले.

Read More

पठाण परिवाराकडून लक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण शुभारंभ

April 30, 2025 0



सोलापूर - इंगळे वस्ती निलम नगर येथील आशा मराठी विद्यालय आणि श्री धर्मण्णा सादूल प्रशालेच्या क्रिडागंण समोरील जागेत पुरातन काळापासून लक्ष्मी मंदिर आहे. याला अवकळा आली होती. शिक्षण समूहाचे संस्थापक हारुण पठाण परिवाराच्या वतीने या मंदिर परिसराचे सुशोभीकरण स्व: खर्चाने करण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर  भूमीपुजन सौ व श्री विष्णू इंगळे सौ व श्री जगदिश मुसळे सौ व श्री भिमा कोरे सौ व श्री चिदानंद निंबाळ या दाम्पत्यांच्या शुभ हस्ते देवीस खणा नारळाची ओटी भरली आणि भूमिपूजन करण्यात आले. तसेच थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.

        




या प्रसंगी आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लिमबानो पठाण, श्री धर्मण्णा सादूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ आफरिन सय्यद मराठा सेवा संघाचे राम गायकवाड आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






पठाण परिवाराकडून हिंदू मंदिर परिसराचे सुशोभीकरण हे बंधुभाव जपणार कार्य आहे. यामुळे धार्मिक एकोपा वाढीस लागेल. श्रध्दास्थान सुशोभीकरण केल्याने एक आत्मिक समाधान मिळेल असे मत हारुण पठाण यांनी व्यक्त केले.





पठाण परिवाराच्या वतीने या पुर्वी ही मातंगी मंदिरा साठी जागा उपलब्ध करून देऊन मंदिराच जिर्णोध्दार केले होते. निलम नगर परिसरातील शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच सहकार्याची भूमिका असते.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot