सोलापूर - डाॅ. वै. स्मृ. शा. वैद्यकीय महाविद्यालय व महाकारुणिक एज्युकेशनल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मा. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १८ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या "वाचू संविधान बारा तास" स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि. १ मे २०२५ रोजी पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे मा. उपअधिष्ठाता डाॅ. दिपक बनसोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. पोलिस आयुक्त सोलापूर शहर श्री. एम. राजकुमार व मा. डाॅ. अग्रजा चिटणीस-वरेरकर वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, श्री. छ.शि.म.स. रुग्णालय सोलापूर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. पृथ्वीचे वाढते तापमान पाहता दीप प्रज्वलन न करता रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल व पारितोषिक खालील प्रमाणे -
पुरुष गट
१) कालकथित गोपीनाथ महादेव डावकर यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक रु. १००००/- व सन्मानचिन्ह - विवेक जैन ८६ गुण
२) दिवंगत आकाश जोगदंड यांच्या स्मरणार्थ, द्वितीय पारितोषिक- रु. ५०००/- व सन्मानचिन्ह - स्वप्नशिल भडकुंबे ८२ गुण
३) आयु. विजया नारायण डांगे यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक रु. ३०००/- व सन्मानचिन्ह - शुभम मोहिते ८० गुण
४) कालकथित अर्जुन कृष्णा खरे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १०००/- व सन्मानचिन्ह -
अश्विन कुमार साबळे ७८ गुण
राहुल मिश्रा ७४ गुण
प्रतीक उग्रल ७४ गुण
पंकज गायकवाड ७२ गुण
८) स्वर्गीय वंदना राजन शिंदे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १०००/- व सन्मानचिन्ह - चेतन कोनापुरे ६८ गुण
महिला गट-
१) भिक्खुणी तेनझीन स्तोकी आणि भिक्खुणी तेनझीन डोलकर समृद्धी वाघमारे यांच्या सौजन्याने प्रथम पारितोषिक रु. १०००/- व सन्मानचिन्ह - मयुरी भालेदार ८० गुण
२) डॉ. एस. बी. क्षीरसागर, प्राचार्य, डी. पी. बी. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांच्या सौजन्याने द्वितीय पारितोषिक रु. ५०००/- व सन्मानचिन्ह - सरस्वती कांबळे ७६ गुण
३) आयु. विद्या सुरेश रोडे यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक रु. ३०००/- व सन्मानचिन्ह - अनुजा गायकवाड ६८ गुण
४) श्री. बाळासाहेब भगवान कदम यांच्या सौजन्याने उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १०००/- व सन्मानचिन्ह -
पूजा सपकाळ ६६ गुण
वैष्णवी चाबुकस्वार ५८ गुण
प्रीती सूर्यवंशी ५६ गुण
वैष्णवी लोखंडे ५४ गुण
८) स्वर्गीय वंदना राजन शिंदे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक रु १०००/- व सन्मानचिन्ह - गायत्री राजगुरू ५२ गुण
याशिवाय कालकथित साधना नेमिनाथ मस्के यांच्या स्मृती प्रित्यर्थ व डॉ. अविनाश घोरपडे यांच्या सौजन्याने, विहान भालेराव, समृद्धी वाघमारे, विरासत थोरे, ऋतुजा सोनवणे, महेंद्र कांबळे अशा वयोगट नऊ ते पंधरा मधील चिमुकल्यांना आणि आशा शिवशरण, शारदा गजभिये, प्रा. डॉ. विजया काकडे, सुरेखा साबळे व तुषार मोरे यांना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी संविधान वाचन ही नुसती स्पर्धा न राहता चळवळ होणे गरजेचे आहे. मिरवणुकीत डॉल्बीवर पैसे खर्च न करता अशा प्रकारचे विधायक व समाज उपयोगी कार्यक्रम करावेत असे प्रतिपादन करून सर्व स्पर्धकांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.
डॉ. अग्रजा चिटणीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीअशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार आयोजित होणे गरजेचे आहे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात उपाधिष्ठाता डॉ. दीपक बनसोडे यांनी संविधान वाचनाच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचे व स्पर्धकांचे कौतुक केले तसेच अशा प्रकारच्या शैक्षणिक व विधायक कार्यक्रमांमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढत आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या डॉ. श्रेया सोनवणे डॉ. शाझिया हसीब खान, डॉ. शबरीश जी. एम., डॉ. कुमार प्रसाद, डॉ. अस्मिता मस्के, श्रीमती नंदा काटे व श्री. राजेश मोरे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. औदुंबर मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड. रवी गजधाने यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सर्वेश कदम, डॉ. शुक्लधन रोडे, डॉ. संचित खरे, डॉ. अवधूत डांगे, ऍड. अमित कांबळे, श्री. प्रवीण सोनवणे, अशोक मस्के, आनंद शिंदे व अमोल वाघमारे यांनी परिश्रम घेतले.