मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे संवर्धन करा - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, March 23, 2025

मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे संवर्धन करा




सोलापूर - मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे संवर्धन करावे यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदणाद्वारे मागणी केली आहे.





शिवस्नुषा श्री छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाची झालेली दुरवस्था अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पराक्रम आणि धैर्याचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराबाई महाराणींची स्मृती कायम राखणे, ही आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे.







याच भावनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. महाराणी ताराराणी यांच्या समाधीचे त्वरित संवर्धन आणि जिर्णोद्धार करण्यात यावा, अशी सर्व शिवभक्तांच्या वतीने मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी निवेदनद्वारे केली आहे.





मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार महाराणी ताराबाई यांच्या गौरवशाली स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या समाधीस्थळाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करतील असे ही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot