सोलापूर- महायुती सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध तसेच नागरिकांना अन्य मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शहर विकास आराखडा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे त्यांचे भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सकारात्मक असून येणाऱ्या काळात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सोलापूर शहराचा विकासाच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिली. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर आहेत.
या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका सर्वसाधारण नागरिकांपर्यंत पोहोचावा. माहयुती सरकारच्या माध्यमातून घेतलेले लोककल्याण्यार्थ निर्णय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा अश्या सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिले.
याप्रसंगी बारामती जिल्हा परिषद मा.सदस्य कुलदीप तावरे, राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवले, माणिक कांबळे, महादेव राठोड, हुलगप्पा शासम, दीपक आरगेल आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment