सोलापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप ) यांच्या वतीने "झोपाळ्यात समाज हिताची चर्चा करताना माता रमाई - डॉ. आंबेडकर" तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा भव्य देखावा सादर करण्यात आला.
या देखाव्यामध्ये हरणे बागडत असलेल्या सुंदर बागेत झोपाळ्यामध्ये एकमेकांशी समाज हिताची चर्चा करत असताना माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. प्रमुख मार्गदर्शक माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटक्या पद्धतीने ही मिरवणूक काढली.
रविवारी सकाळी 12 वाजता या मिरवणुकीची सुरुवात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोराडे, उद्योजक इंदरमल जैन, धूत सारीजचे पुरुषोत्तम धूत, मंडळाचे मार्गदर्शक माजी गट नेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी , बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सवाचे अध्यक्ष विकी शेंडगे, रॉकी बंगाळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दिमाखात ही मिरवणूक मार्गस्थ झाली.
यावेळी पी. बी. ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे, प्रतीक चंदनशिवे, उत्सव अध्यक्ष बाबा गायकवाड, कार्याध्यक्ष प्रथमेश सुरवसे, धीरज वाघमोडे, एस. के. फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर, उपाध्यक्ष महेश श्वाके, सचिव सिद्धांत तळभंडारे, खजिनदार रवी मॅतरोलु ,श्रीमंत जाधव, अॅड. विशाल मस्के आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंडळाच्या देखाव्याचे कौतुक केले. सर्वांनी शिस्तबद्ध रित्या शांततेत मिरवणूक काढण्याचे आवाहन करताना शुभेच्छा दिल्या. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनीही सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
आदर्श घेण्यासारखा देखावा : आनंद चंदनशिवे
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. डॉ. आंबेडकर हयात असताना पासून सोलापूर शहरात मिरवणुकीची परंपरा आहे. त्यामुळे आमच्या मंडळाने समाजाला आदर्श वाटेल असा देखावा सादर केला आहे. सर्व जाती - धर्माचे लोक या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने सहभागी होतात, असे यावेळी मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment