मुंबई - समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेले महात्मा बसवेश्वर यांची जयंती दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी होणार आहे. मंगळवेढा हे त्यांचे कर्मभूमी असून, त्यांनी येथे सलग बारा वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करून समतेचा व लोकशाहीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. या ठिकाणी त्यांची जयंती शासनामार्फत भव्य व शासकीय स्वरूपात साजरी होणे अत्यंत आवश्यक आहे.महाराष्ट्र शासनाने २००१ पासून महात्मा बसवेश्वर यांचा महापुरुषांमध्ये समावेश केल्याने सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. तसेच, शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १८ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक संस्थांमध्ये जयंती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंगळवेढा येथील समता भूमी (राष्ट्रीय स्मारक) येथे हा उत्सव व्यापक स्वरूपात व भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.या अनुषंगाने, महात्मा बसवेश्वर जयंती २०२५ मंगळवेढा येथे भव्य स्वरूपात साजरी यावे अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी मुंबई येथील टिळक भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी केली असता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच माजी मंत्री जन स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे (सावकार) व सोलापूर लोकसभाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा शासनाकडे मागणी केली आहे.
यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले शासकीय उपक्रमामुळे लिंगायत समाजाच्या भावनांचा सन्मान होईल, सामाजिक ऐक्य बळकट होईल आणि महात्मा बसवेश्वर यांच्या समतावादी विचारांचा प्रसार होईल. तसेच, मंगळवेढा येथील समता भूमीचे राष्ट्रीय स्मारक म्हणून महत्त्व अधोरेखित होईल.आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रस्तावित कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्देश द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केले आहे.
जागतिक लिंगायत महासभेचे वतीने प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव व मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment