12 ते 14 एप्रिल दरम्यान विधीगंध चषक क्रिकेट स्पर्धा तर विधीगंध स्मृती पुरस्काराचे वितरण - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, April 11, 2025

12 ते 14 एप्रिल दरम्यान विधीगंध चषक क्रिकेट स्पर्धा तर विधीगंध स्मृती पुरस्काराचे वितरण

 



सोलापूर - विधीगंध सेवा संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही वकीलांच्यासाठी विधीगंध टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि. 12 ते 14 एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आले तसेच आपल्या वकीली क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तीन ज्येष्ठ वकीलांना पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती विधीगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    





सोलापूरच्या नेहरू नगर शासकीय मैदानावर दि. 12 एप्रिल पासून ते 14 एप्रिल पर्यत वकीलांच्या विधीगंध चषक स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये एकूण वकीलांचे 25 संघ सहभागी होणार आहेत. 10 षटकांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.वकीलांमध्ये सांघिक भावना वाढावी या हेतुने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 






तसेच वकील क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या नावाने तीन ज्येष्ठ वकीलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वर्गिय भास्कर ऊर्फ तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधीगंध पुरस्काराने अ‍ॅड वसंतराव भगवान भादुले यांना तसेच स्वर्गिय आण्णासाहेब ऊर्फ ए.तु.माने स्मृती पुरस्कार अ‍ॅड दत्तात्रय नानासाहेब काळे यांना तर स्वर्गिय ए.डी.ठोकडे स्मृती विधीगंध पुरस्कार अ‍ॅड. पी.आर. बापुसाहेब करंजकर यांना देवून सन्मान करण्यात येणार आहे.






सोलापूरचे सुपुत्र देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम शनिवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रंगभवन येथे होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. जहिर सगरी, अ‍ॅड.शैलेश पोटफोडे, अ‍ॅड. सचिन साखरे, अ‍ॅड. योगेश कुरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot