सोलापूर - एमआयडीसी परिसरातील आशा नगर येथील श्री आद्य जगद्गुरु देवरदासमय्या हटगार कोष्टी समाज सामाजिक संस्था या जागेवर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून श्रींच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये निधी मंजूर झाला होता त्या सभा मंडपाचा लोकार्पण शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या फायर ब्रँड नेत्या प्राध्यापक डॉक्टर ज्योतीताई वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी हटगार कोष्टी समाजाचे अध्यक्ष सिध्दाराम निंबाळ, सोलापूर जिल्हा युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय मोरे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी समाजातील जेष्ठ व्यक्ती बसलींगप्पा नंदर्गि,चनबसप्पा अतनुरे, जन्मोत्सव उत्सव अध्यक्ष राजशेकर श्रीगण आदिंसह हटगार कोष्टी समाज सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य आणि समाज बांधवांची उपस्थिती होती. आद्य जगद्गुरु देवरदासमय्या यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रथोत्सव मिरवणुकी दरम्यान प्रा.डॉ.ज्योतीताई वाघमारे यांचा सत्कार यावेळी संस्थेच्या वतीनं करण्यात आला.
येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हटगार कोष्टी समाजातील बांधवांच्या विविध प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही यावेळी प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी दिलं. यावेळी समाज बांधवांनी देखील प्रा. डॉ.ज्योतीताई वाघमारे यांचे आभार मानत पुढील काळात समाजासाठी आपले भरीव कार्य आपल्या हातून घडो अशी आशा देखील यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुळेश अतनुरे यांनी केले तर आभार संतोष मड्डे यांनी मानले.
No comments:
Post a Comment