शहर मध्य मतदारसंघातील ४६ रस्त्यांसाठी १२ कोटी रुपयांचा विशेष निधी - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, April 12, 2025

शहर मध्य मतदारसंघातील ४६ रस्त्यांसाठी १२ कोटी रुपयांचा विशेष निधी

  



सोलापूर :  सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील ४६ रस्त्यांसाठी १२ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या विशेष निधीमुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या परिसरातील रस्ते होणार असून या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


शहर मध्य मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी २०२४- २५ च्या निधीतून ही तरतूद करण्यात आली आहे. शहर मध्य मतदारसंघात मुख्यतः कामगार वर्ग, शाळा महाविद्यालये, व्यापारी, उद्योजक, शासकीय कार्यालये अधिक असणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या ठिकाणी रस्ते नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही रस्ते न झाल्यामुळे नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी परिसरात रस्ते करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागण्यांची तत्परतेने दखल घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात रस्ते करण्यासाठी विशेष निधीची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी १२ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून हद्दवाढ भागासह गावठाण परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्ते करण्यात येणार आहेत.





गेल्या १५ वर्षांपासून शहर मध्य मतदारसंघात भाजपाचा आमदार नसल्याने भाजपाला मानणाऱ्या मतदारांच्या परिसरात रस्त्यांची कामे तुलनेने अत्यंत कमी झाली. अनेक भागात चांगले रस्ते नसल्यामुळे परिणामी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे शहर मध्य मतदारसंघातील रस्त्यांसाठी विशेष आणि भरीव निधी मिळावा यासाठी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहर मध्य मतदारसंघासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याबद्दल शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार ! शहर मध्य मतदारसंघाचा विकास आता थांबणार नाही.

-- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot