सोलापूर - सोलापूर महानगरपलिकेच्या वतीने दि. ०३ एप्रिल, २०२५ ते दि. १७ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये मा.आयुक्त यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच झाडूवाला,बिगारी, सफाई कामगार (रोजंदारी व बदली कामगारासह) क्षमता बांधणी कार्यशाळा दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत घेणेत येत आहे.
या अनुषंगाने दि.१५/०४/२०२५ रोजी विभागीय कार्यालय क्र.६ कडील सर्व चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी यांची आरोग्य निरीक्षक व मुख्य आरोग्य निरीक्षक यांचेसह म.न.पा.मधील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे कार्यशाळा आयोजित करणेत आली होती. या कार्यशाळेत सर्व सफाई सेवकांना दैनंदिन वेळेवर उपस्थित राहणे, स्वच्छता, झाडलोट, डिव्हाडरलगत व फुटपाथलगत साचलेली माती काढणे, डिव्हाडरमधील कचरा काढणे, डिव्हाडरमधील वाढलेली झाडे छाटणी करणे, सेवापुस्तक वेळेवर अद्यावत करून घेणे, रजेचे अर्ज वेळेवर जमा करणे इत्यादीबाबत सूचना देण्यात आल्या. सदरची कार्यशाळा दैनंदिन कामकाजामध्ये सुसूत्रता येणेसाठी कार्यशाळा आयोजित करणेत आली होती.
या कार्यशाळेमध्ये सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे मनोबल वाढविणे तसेच ते करीत असलेल्या चांगले स्वच्छता कामाची त्यांना शाबासकी थाप देणेसाठी, तसेच त्यांना सर्व सुरक्षा साहित्य वापरणे, नागरिकांशी व्यवस्थितपणे संवाद करणे इत्यादी विषयांबाबत सहा.आयुक्त शशिकांत भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल चराटे व संबंधित झोनचे मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक त्यांचे कर्मचा-यांसह उपस्थित होते.
याच कार्यशाळेप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडील ब्रँड अँबेसिडर (स्वच्छता विभाग), यशवंत गंगाराम कन्हेरे, वय वर्ष 69 हे देखील उपस्थित होते. यशवंत गंगाराम कन्हेरे, हे त्यांचे दुचाकीवरून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 36 जिल्ह्यांतर्गत प्रवास करीत आहेत. आज त्यांनी या कार्यशाळेत त्यांनी उपस्थित राहून सर्व कर्मचा-यांशी संवाद साधला. या वेळेस त्यांनी कर्मचा-यांना चांगले आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, रोजच्या कामामधील सामाजिक बांधिलकी, सुयोग्य वर्तन, वरिष्ठाचा सन्मान, व्यसनधिनता इत्यादीबाबत मार्गदर्शन केले.
यशवंत गंगाराम कन्हेरे हे अध्यक्ष ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान चिंचवड येथे मार्गदर्शक म्हणून काम पाहत असून त्यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली आहे. यशवंत गंगाराम कन्हेरे हे बजाज ऑटो पुणे येथून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना शहर स्वच्छतेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले असून उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजामध्ये या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल व शहर स्वच्छ व सुंदर दिसेल असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment