जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करा - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, April 24, 2025

जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करा

  

 



सोलापूर - वंचित बहुजन आघाडी सोलापूर सर्व जिल्ह्यांच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विलेपार्ले येथील जैन मंदिर चुकीच्या व बेकायदेशीर रित्या त्यांचा क्रूर पद्धतीने बुलडोझर व जेसीबीच्या साह्याने मंदिर उद्ध्वस्त केले आहे एवढंच नाही तर मंदिर उद्ध्वस्त करताना तेथील धार्मिक ग्रंथ पूजा साहित्याचे विटंबना करण्यात आली आणि मूर्ती देखील भंग करण्यात आली, 

   




सदर प्रशासनाच्या या जुलमी चुकीच्या बेकायदेशीर वागण्यामुळे समस्त जैन धर्मीय समाज बांधव अत्यंत आक्रोशीत आहे, भारतीय संविधानात सर्व धर्मीयांना संरक्षण दिले गेले आहे असे असताना विलेपार्ले येथील आरक्षित जागेवरील जागेवरील मंदिर पाडण्यात आले सदर प्रशासनाच्या विरोधात कठोर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावी आणि मंदिरपुनर स्थापित करून मंदिराची शोभा वाढवावी अशा प्रकारचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

            






याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे , जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सोहेब सय्यद , बार्शी तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख, बाबुराव बनसोडे अण्णा,  शहर चे मल्लिकार्जुन हिरेमठ, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता रविराज पोटे, अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, भारिप माजी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड आधी पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot