राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध, मृतांना वाहली श्रद्धांजली - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, April 24, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध, मृतांना वाहली श्रद्धांजली

 



सोलापूर - जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सोलापूर शहर राष्ट्रवादी कडून सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर  मुक आंदोलन करत दंडाला काळ्या फिती लावून जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.






यावेळी भारत माता की जय , वंदे मातरम् , धिक्कार असो धिक्कार भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अश्या घोषणांनी चार हुतात्मा चौक परिसर दणाणून सोडला.






या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात जे निष्पाप नागरीक मृत्यूमुखी पडले त्या निष्पाप शहीद झालेल्या नागरिकांना कँडल लावून दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.







भारतीय सैन्य दलाने या हल्ल्यातील दहशतवादी अतेरेकी हल्लेखोरांचे तळाचे पायेमुळे शोधून काढून गोळ्या घालून ठार करावे अशी मागणी करीत राष्ट्राची सुरक्षा ही सर्वप्रथम आहे  याकरीता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसेच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव एकजुटीने सोबत आहे अशी भावना जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली .






याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर युवक अध्यक्ष सुहास कदम महीला कार्याध्यक्ष  चित्रा कदम, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,विशाल बंगाळे , खलिल शेख साजिद पटेल महेश कुलकर्णी, दत्तात्रय बडगंची ,शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख,OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष आयुब शेख, श्यामराव गांगर्डे , सांस्कृतिक नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज अबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, प्रज्ञासागर गायकवाड रेणूका मंद्रूपकर सुरेखा घाडगे शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,दक्षिण अल्पसंख्याक अध्यक्ष अशपाक कुरेशी, मध्य विधानसभा नयुम सालार , अल्पसंख्याक उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने, इस्माईल शेख, जहीर शेख , रसूल जमादार , श्रेयस घाडे, सागर गव्हाणे, राहुल म्हेत्रे ,प्रकाश पल्लारे, अविनाश तलारे, सोमशेखर साखरे पवन चलवादी ,अनिल सिंगारे, सागर कोळी , सागर गोप रेड्डी, मॉन्टी शिंगारे, गणेश म्हेत्रे, वासू विटे , प्रभू जंगडगी, शिवम सनले, श्रीकांत सोनके, महेश भंडारे, नागेश कोळी , राजू वाकीटयेळु यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot