Swarajya News Marathi : गुन्हेगारी

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label गुन्हेगारी. Show all posts
Showing posts with label गुन्हेगारी. Show all posts

Thursday, April 24, 2025

सरकारी कामात अडथळा, महापालिकेच्या त्या अधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता

April 24, 2025 0

 



 


सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेचे निवृत्त अतिक्रमण अधिकारी यांची सरकारी कामात अडथळा निर्माण  केल्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.


 



यात हकीकत अशी की, यातील फिर्यादी राहुल बनसोडे हे सोलापूर महानगरपालिका विभागातील दक्षता पथकामध्ये कामास होते. दि. ०४/०१/२०१४ रोजी फिर्यादी हे त्यांच्यासोबतच्या ड्रायव्हर सोबत गाडीमधील इंधन संपल्याने डिझेल मागणी पत्र घेण्यासाठी सोमपा कार्यालयातील स्थानिक कर संस्था कार्यालयामध्ये मध्ये गेले होते. त्यावेळी फिर्यादी हे प्रशासकीय इमारतीसमोर थांबले असताना निवृत्त अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे हे त्या ठिकाणी आले व त्यांनी तू स्थानिक संस्था विभागात कसे काम करतो, तू माझ्यासमोर शेंबडा आहेस, असे म्हणून शिवीगाळ करत तुला बघून घेतो, अशी दमदाटी केली. त्यावेळी त्या ठिकाणी पडलेल्या कुदळीच्या दांड्याने फिर्यादीच्या पाठीवर व उजव्या हातात मारले. त्यानंतर आरोपी हा तेथून निघून गेले. आरोपीने फिर्यादीस शासकीय कर्तव्यावर असताना शिवीगाळ करून दमदाटी व मारहाण केल्याबाबतची फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केलेली होती. 

      





सदर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी निवृत्त अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्याविरुद्ध मे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र पाठविले होते.

        





सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात साक्षीदारांच्या मे. न्यायालयासमोरील जबाबात व पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात तफावत व विसंगती असल्याचे, तसेच फिर्यादी व साक्षीदार हे घटनेच्या वेळी कामावर हजर असल्याबाबत योग्य व सबळ पुरावा मे. न्यायालयासमोर आलेला नाही. तसेच स्वतंत्र साक्षीदार  असताना त्यांच्याकडे तपास केला नाही तसेच तपासी अंमलदाराने बनवलेल्या कागदपत्रात अत्यंत गंभीर चुका व तफावत असल्याचे मे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 

       





ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून निवृत्त अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांची मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे.

      




सदर प्रकरणात निवृत्त अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. शिल्पा कुलकर्णी (नोटरी भारत सरकार), ॲड राणी गोडरबलू, ॲड. ओंकार परदेशी, ॲड. मधुश्री देशपांडे यांनी काम पाहिले.

Read More

तीन शाळांवर शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन ; चौकशीचे आदेश जारी

April 24, 2025 0



सोलापूर - बार्शीतील तीन शाळांकडून शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचे सातत्याने उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश मोरे यांनी केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने याची तात्काळ दखल घेतली आहे. आयोगाने जनसेवा हायस्कूल, न्यू शहाजीराव भड प्राथमिक विद्यामंदिर आणि श्रीमान शिवाजीराव गुंड आदर्श प्राथमिक विद्यामंदिर या तीन शाळांवर सखोल चौकशीचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांना दिले आहेत.





दिनांक ६ मार्च २०२५ रोजी गणेश मोरे यांनी आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मते, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार आवश्यक असलेल्या वाचन, लेखन व गणितातील प्राथमिक कौशल्यांचे शिक्षण दिले जात नाही. तसंच मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक विकासात अडथळा निर्माण झाला आहे.





तक्रारीत नमूद केल्यानुसार, या शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, योग्य संख्येने स्वच्छतागृहे, पुरेशा वर्गखोल्या, तसेच शैक्षणिक साहित्याचा अभाव असून, शिक्षकांची संख्या आणि पात्रता देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य अशा अपूर्ण आणि नियमबाह्य व्यवस्थेत अडकले आहे, असा आरोप करण्यात आला आहे.






बाल हक्क आयोगाने जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना या तिन्ही शाळांची सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या चौकशीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, मूलभूत सुविधा, शिक्षकांची पात्रता आणि आरटीई कायद्याच्या इतर तरतुदींचे पालन याचा समावेश असेल. जर नियमभंग सिद्ध झाला, तर शाळांची मान्यता रद्द करण्यासह कठोर उपाययोजना राबवण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.





शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार, ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. या कायद्यात खालील बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत:

प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, पिण्याचे पाणी व शैक्षणिक साहित्य यासारख्या सुविधा.

प्रशिक्षित व पात्र शिक्षकांची नियुक्ती.

विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार कौशल्ये शिकवणे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व दर्जेदार शिक्षणाचा पुरवठा.


या कायद्याच्या उल्लंघनाबाबत शाळांवर दंडात्मक कारवाई किंवा मान्यता रद्द करण्याची तरतूद आहे.






या प्रकरणामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. अनेक पालकांनी याआधी देखील शाळांतील दुरवस्थेची तक्रार केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आता राज्यस्तरीय आयोगाने हस्तक्षेप करावा लागला आहे. गणेश मोरे यांच्या या पुढाकारामुळे अनेक सामाजिक संघटनांनी देखील या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.





चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयोग पुढील निर्णय घेणार आहे. या निर्णयात शाळांना सुधारणा करण्यासाठी मुदत देणे, दंड आकारणे किंवा शाळांची मान्यता रद्द करणे याचा समावेश असू शकतो. या प्रकरणाचा निकाल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी एक दिशादर्शक ठरेल, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.





गणेश मोरे यांच्या पुढाकारामुळे बार्शीतील शिक्षण व्यवस्थेतील अनेक त्रुटी उघड झाल्या असून, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. ही कारवाई केवळ तात्कालिक नसून, शिक्षणाच्या गुणवत्तेचा दीर्घकालीन पाया मजबूत करण्यासाठी निर्णायक ठरू शकते.

Read More

Thursday, April 17, 2025

अवैध कत्तलखाने केले सील...प्रशासनाची मोठी कार्यवाही

April 17, 2025 0

 



सोलापूर - प्रशासनाचा सर्वात मोठा दणका शास्त्री नगर दक्षिण सदर बजार मध्ये 3 अनधिकृत कत्तलखान्यात छापा मारून सिल केले गेले आहेत. आयुक्त सचिन ओंम्बासे यांच्या आदेशावरून सदर बजार पोलिस API आयवळे यांच्या 5 पोलिस टीम व मंडई अधीक्षक तोडकर, सहा निरीक्षक कट्टिमनी व इतर सहकारी सोबत उपायुक्त किरणकुमार मोरे, सहा आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली, त्याबद्दल सर्व गोप्रेमी व गोरक्षक तर्फे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.





महाराष्ट्र शासन प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती सदस्याकडून आव्हान करण्यात येत आहे की सोलापूर शहरात कोठेही अनधिकृतरित्या कत्तलखाने व गोमातेची हत्या चालू असेल तर त्याचे  फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन लोकेशन, महापालिका मंडई अधीक्षक किंवा पोलीस कट्रोल रूम  वर कळवावे त्यांच्यावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.






तसेच अन्न व प्रशासन विभागा तर्फे मास व मछि दुकाना साठीचा परवाना दिला जातो परंतु जिल्ह्या मध्ये हजारोच्या संख्येत विना परवाना दुकाने अनेक भागात राजरोस सुरू असून दुकानाच्या मागील बाजूस बकरे व कोंबड्या उधड्यावर गटारी व उकरड्या शेजारीच कापले जातात व तेच मास उघड्यावर विक्री केली जाते त्या मुळे अश्या अनधिकृत व बेकायदेशीर दुकानावर अन्न व प्रशासन विभागाने पोलिसांची मदत घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे, नाहीतर पुन्हा बर्डफ्लू सारखे संसर्गजन्य रोग प्रसरू शकतील, व महानगर पालिकेला उपाय योजना करत बसावे लागेल.





मृत प्राणी व पक्षी यांच्या करिता विद्युत दाहिनी तयार असून ती अद्याप कार्यान्वीत का होत नाही. मागील 3 वर्षा पासून प्राणी क्लेश प्रतिबंधीत समिती चे गठन पशु उपायुक्त हे करत नाहीत त्या मुळे ह्या सगळ्या गोष्टी वर कोणाचेच नियंत्रण राहत नाही. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा ही पशु पक्षी व प्राणी प्रेमींची अपेक्षा आहे.

Read More

Wednesday, April 9, 2025

पूर्व वैमनश्यातून पती-पत्नीवर गोळीबार; कुठे घडला हा थरार ?

April 09, 2025 0





सोलापूर - पूर्व वैमनश्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची घटना येवती, ता. मोहोळ येथे मंगळवार ता. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता येवती- रोपळे मार्गावर घडली.


शिवाजी जाधव व सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. दरम्यान त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून, श्रीमती सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे.




दरम्यान, गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी एक अधिकारी व 10 कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले. घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेडगे यांना तपासा बाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.




पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन आटोपून येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले.




त्यांना तातडीने पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सुरेखा गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार होताच येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे व दोन मॅक्झिन पोलिसांना मिळून आल्या.




दरम्यान घटना स्थळावर ठसे तज्ञांना पोलिसांनी पाचारण केले होते. घटना स्थळावर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर मोहोळ व पंढरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उशिरा पर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.

Read More

Tuesday, April 8, 2025

स्कुल बसच्या चाकाखाली आल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

April 08, 2025 0

 



सोलापूर -  अनुराग तिप्पण्णा राठोड (वय 13) रा. बसवेश्वर नगर, देगांव. शाळेचे नांव संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळा, कवठे, सोलापूर याचा स्कुल बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे.


देगांव - बेलाटी रस्त्यावर सदरचा अपघात दि. 8 एप्रिलला दुपारी 12 च्या सुमारास घडला असून अपघात स्थळी तोबा गर्दी झाली होती. सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथील पोलीस घटनास्थळी पोहचून अपघातास कारणीभूत असलेली स्कुल बस ताब्यात घेऊन सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे आणुन लावली. पुढील तपास पोलीस करत आहेत.



घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे असे आहे कि, सदर स्कुल बसमधे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करत होते व चालत्या गाडीतून मृत विद्यार्थी खाली पडला व याच गाडीची चाके त्याच्या डोक्यावरुन गेल्याने डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा होऊन अवघ्या काही सेकंदातच विद्यार्थी जागीच मरण पावला.


   

पूढील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्याचे शव सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे नेण्यात आले आहे. हॉस्पिटलमधे नागरिक व मृताचे नातेवाईक यांची गर्दी झाली असून त्यांचे म्हणणे असे आहे कि जोपर्यंत संबधित स्कुल बस चालक व शाळा संस्था चालकांवर हलगर्जीपणा करुन मृत्युस कारणीभूत ठरल्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.

Read More

चोरून चालणाऱ्या अवैध गावठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त

April 08, 2025 0

 



सोलापूर - पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पोलीस अधीक्षक पदाचा स्वीकारले पासुन ऑपरेशन परिवर्तन या मोहीमे अंतर्गत पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी ऑगस्ट 2024 ते मार्च 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबवुन पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टया व दारूची विक्री करणा-या विरूध्द छापा कारवाई केली आहे.  

     




चोरून अवैधरित्या देशी दारूच्या हातभट्टयावर व दारू विक्री करणा-या याचे विरूध्द केलेल्या कारवाईत एकूण 1 कोटी 35 लाख 32 हजार 420 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 20 हजार 7 हजार 322 लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू, प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू, हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. चोरून हातभट्टी दारूची विक्री करणारे याचेकडुन 3285 लिटर हातभट्टी दारू व दारूची विक्री करणारे यांचेकडुन 638 देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.

     





चोरून अवैध दारूच्या हातभट्टया व दारूची विक्री करणा-या एकूण 144 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ व 65 ई अन्वये एकूण 141 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

     




यापुर्वी देखील सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणा-या अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून कारवाई करून संबंधीत इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात असून यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाई करण्यात येणार असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे. 

       





दिनांक 05.04.2025 रोजी वरळेगाव तांडा व गणपत तांडा येथे चोरून अवैध दारूच्या हातभट्टया चालविणारे एकूण 2 इसमा विरूध्द कारवाई करून एकूण 4 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 60 प्लॅस्टिक बॅरेल, 12000 लिटर गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.

       





अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणा-या इसमाचा गुन्हेगारी अभिलेख पडताळुन त्यांचे विरूध्द तडीपार, एम.पी.डी.ए. (MPDA) सारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम चालु असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे.  

      



सदरची छापा कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे. 

Read More

Post Top Ad

Your Ad Spot