सरकारी कामात अडथळा, महापालिकेच्या त्या अधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, April 24, 2025

सरकारी कामात अडथळा, महापालिकेच्या त्या अधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता

 



 


सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेचे निवृत्त अतिक्रमण अधिकारी यांची सरकारी कामात अडथळा निर्माण  केल्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.


 



यात हकीकत अशी की, यातील फिर्यादी राहुल बनसोडे हे सोलापूर महानगरपालिका विभागातील दक्षता पथकामध्ये कामास होते. दि. ०४/०१/२०१४ रोजी फिर्यादी हे त्यांच्यासोबतच्या ड्रायव्हर सोबत गाडीमधील इंधन संपल्याने डिझेल मागणी पत्र घेण्यासाठी सोमपा कार्यालयातील स्थानिक कर संस्था कार्यालयामध्ये मध्ये गेले होते. त्यावेळी फिर्यादी हे प्रशासकीय इमारतीसमोर थांबले असताना निवृत्त अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे हे त्या ठिकाणी आले व त्यांनी तू स्थानिक संस्था विभागात कसे काम करतो, तू माझ्यासमोर शेंबडा आहेस, असे म्हणून शिवीगाळ करत तुला बघून घेतो, अशी दमदाटी केली. त्यावेळी त्या ठिकाणी पडलेल्या कुदळीच्या दांड्याने फिर्यादीच्या पाठीवर व उजव्या हातात मारले. त्यानंतर आरोपी हा तेथून निघून गेले. आरोपीने फिर्यादीस शासकीय कर्तव्यावर असताना शिवीगाळ करून दमदाटी व मारहाण केल्याबाबतची फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केलेली होती. 

      





सदर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी निवृत्त अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्याविरुद्ध मे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र पाठविले होते.

        





सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात साक्षीदारांच्या मे. न्यायालयासमोरील जबाबात व पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात तफावत व विसंगती असल्याचे, तसेच फिर्यादी व साक्षीदार हे घटनेच्या वेळी कामावर हजर असल्याबाबत योग्य व सबळ पुरावा मे. न्यायालयासमोर आलेला नाही. तसेच स्वतंत्र साक्षीदार  असताना त्यांच्याकडे तपास केला नाही तसेच तपासी अंमलदाराने बनवलेल्या कागदपत्रात अत्यंत गंभीर चुका व तफावत असल्याचे मे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 

       





ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून निवृत्त अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांची मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे.

      




सदर प्रकरणात निवृत्त अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. शिल्पा कुलकर्णी (नोटरी भारत सरकार), ॲड राणी गोडरबलू, ॲड. ओंकार परदेशी, ॲड. मधुश्री देशपांडे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot