सोलापूर - आमदार विजय देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूमी अधीक्षक दादा घोडके व महानगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मठपती यांच्या समवेत गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली.
मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देशन दिले होते की तत्काळ मोजणी नकाशा व गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण निकाली लावावे व बांधकाम परवाने चालू करण्यात यावे. त्यानुसार येणाऱ्या 8 - 10 दिवसांमध्ये कॅम्पद्वारे महापालिकेने व जिल्हाधिकारींनी परिपत्रक काढावे. तसेच त्यामध्ये अट अशी असेल की कॅम्प मध्ये ज्या नागरिकांचे 7/12 आणि खरेदीखत असेल त्यांची मोजणी त्वरित करून आठवड्याभरात बांधकाम परवाना देण्यात येईल. तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी तत्काळ हे काम लवकरात लवकर सुरुवात करावे असे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी माजी सभागृहनेते शिवानंद पाटील, चेतन पाटील संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या