सोलापूर : मागील वीस वर्षापासून सोलापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत येणाऱ्या हिप्परगा पाटबंधारे शाखा येथील एखरूख मध्यम प्रकल्प, तालुका उत्तर सोलापूर येथील डाव्या कालव्यातील पंप बंद होता. याची माहिती मिळताच शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाठपुरावा करून इंग्रज कालीन जॅकवेल दुरुस्त करून घेतला.
हिप्परगा तलावातील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यामार्फत शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पूर्वी मिळत होते परंतु दोन्ही इंग्रज कालीन जॅकवेल बंद झाल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने हाल होत होते. एकरूप मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून इंग्रजांनी बांधलेल्या कालव्यातून जॅकवेलच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येत होते. वीस वर्षापासून हे जॅकवेल बंद होते भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी वारंवार पाठ करून ते जॅकवेल दुरुस्त करून घेतले आणि शेतकऱ्यांना न्याय दिला. हिप्परगा ते शेळगी दहिटणे या सहा किलोमीटर च्या माध्यमातून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. दुरुस्त केलेल्या जॅकवेल ची पूजा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले.
यावेळी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन सिद्धाराम चाकोते, सोलापूर पाटबंधारे शाखेचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक एस एस खांडेकर, कार्यकारी अभियंता एम टी जाधवर, उपविभागीय अभियंता पी एम बाभा, रेवणसिद्ध यलशेट्टी, सिद्धाराम धप्पाधुळे, सुरेश हत्ती, सुरेश फलमारी, राजू हैशेट्टी, देविदास चेळेकर, समीर देशपांडे, श्रीरंग गवई, शाखा अभियंता पी एल शेवाळे, कालवा निरीक्षक आर जी गायकवाड, एस एस नागणसूर, एस एस पाटील, मोहन पाटील, लहू बचुटे आदींसह भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिप्परगा डावा कालवा हिप्परगा, शेळगी ते दहिटणे मार्गातील शेतकऱ्यासाठी भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी शर्तीचे प्रयत्न करून इंग्रज कालीन जॅकवेल दुरुस्त करून घेतले आणि आज शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले, सबंध शेतकऱ्यांच्या वतीने देशमुख मालकांचे आभार.
रेवनसिद्धाप्पा यलशेट्टी (शेतकरी)
सिद्धाराम धप्पाधुळे (शेतकरी)
हिप्परगाचे पाणी मिळावे अशी हिप्परगा डाव्या कालव्याच्या मार्गातील शेतकऱ्यांची मागणी होती वीस वर्षापासून बंद असलेल्या जॅकवेल दुरुस्त करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला, उजनीतील पाणी लिफ्ट करून हिप्परगात घेतले जाते हिप्परगा दहिटणे डाव्या कालव्याच्या मार्गातील शेतकऱ्यांना आनंदाची बाब आहे आज पाणी सोडल्याने शेतकरी आनंदी होतील.
विजयकुमार देशमुख (आमदार, भाजप)