Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

LightBlog

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, May 1, 2025

महाराष्ट्र राज्य बँक मित्र कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

May 01, 2025 0

 


सोलापूर - विविध बँकांमध्ये बँक मित्र म्हणून काम करणाऱ्या सोलापुरातील जवळजवळ 100 बँक मित्रांनी आज त्यांच्या मागण्यासाठी पुनम गेट सोलापूर येथे कामगार दिनाचे औचित्य साधून मागणी दिवस व धरणे आंदोलन केले बँक मित्रांना मिळणारे कमिशन त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवाशर्ती तसेच इतर बँक कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुरक्षा मिळाव्यात  इत्यादी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. बँकिंग क्षेत्रातील सर्वात बलाढ्य अशी संघटना ए आय बी इ ए यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईस फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. 






या आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन चे जिल्हा समन्वयक कॉम्रेड सुहास मार्डीकर, महाराष्ट्र बँक युनियनचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉम्रेड संतोष चित्याळकर, तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक कॉम्रेड अशोक इंदापुरे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काँग्रेस शंतनू गायकवाड,  संयुक्त  कामगार कृती दल समिती चे अध्यक्ष अॅड. एम एच शेख, रेल्वे माथाडी कामगार संघटनेचे कॉम्रेड रमेश बाबू, बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड औब्रि अलमेडा, महाराष्ट्र बँक रिटायरिज असोसिएशनचे कॉम्रेड प्रसाद आतूनुरकर, महावितरण कर्मचारी संघटनेचे काँ कोल्हे इत्यादींनी मार्गदर्शन केले.







आंदोलन यशस्वी करण्यासाठी सचिन काळे, सचिन संकद कॉम्रेड सोमनाथ ऐवळे व इतर कॉम्रेडसनी महत्त्वाचे योगदान दिले या आंदोलनात बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक इत्यादी बँकेतील अनेक बँक मित्र सहभागी झाले होते आंदोलनानंतर माननीय निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More

पदमशाली शिक्षण संस्थेतील शिक्षकांचे आमरण उपोषण

May 01, 2025 0

 


सोलापूर - भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे विविध मागण्यासाठी एक मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले.





प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे , प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण मंडळ मनपा सोलापूर तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी जि. प. सोलापूर  व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यालयीन दिरंगाईमुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID यांसारख्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील पूनम गेट येथे आमरण उपोषण सुरू केले.





सदरचे आमरण उपोषणास बालाजी लोकरे, विनायक बिराजदार,  सागर दूर्गी, अमर पवार व नागनाथ गिराम  सौ सपना मोरे  सौ सुजाता भैसे आदि शिक्षक बसले असून संस्थेतील इतर 34 शिक्षक हे चक्री उपोषण करणार आहेत. अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या ठिम्म कारभारामुळे शिक्षकांचे कुटुंब देशोधडीला लागत आहेत. 





याच प्रकारची कार्यालयीन उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेली आहे. वर्षानुवर्ष अधिकाऱ्यांच्या टेबलावरून फायली हलल्या जात नाहीत. अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्त्यामुळे शिक्षकांना आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे.





सदरच्या उपोषणासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी , शिक्षक संघटनांनी, विविध सामाजिक संघटनांनी व पालकांनी या उपोषणासाठी पाठिंबा दिलेला आहे.

Read More

अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग सदाबहार संपन्न

May 01, 2025 0

 



सोलापूर-  महात्मा बसवेश्वर महामंडळ, विजापूर रोड आणि जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने   ओम गर्जना चौक,सवेरा नगर सैफुल येथे बसव जयंतीनिमित्त आयोजित एका विशेष व्याख्यान आणि जीवनगौरव -सन्मान समारंभाचे प्रथम श्रेणीचे सरकारी कंत्राटदार परमानंद अलगोंडा पाटील यांनी बसवण्णाच्या प्रतिमेला प्रार्थना करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जागतिक लिंगायत महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. 






व्यासपीठावर माजी आमदार शिवशरण पाटील, डॉ. शरणबसव हिरेमठ, शिक्षक नेते सूर्यकांत भरले व वीरभद्र यादवाड , शासकीय कंत्राटदार रेवणसिद्ध बिज्जरगी, चन्नबसप्पा गुरुभेट्टी, जागतिक लिंगायत महासभाचे अध्यक्ष शिवानंद गोगाव ,माजी विस्तार शिक्षणधिकारी अशोक भांजे,  सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण चलगेरी, नामदेव फुलारी, महिला अध्यक्षा राजेश्री थलंगे,आदी उपस्थित होते.              







शंकरलिंग महिला मंडळ आणि जागतिक लिंगायत महासभेच्या महिला सदस्यांनी सादर केलेल्या 'अनुभव मंडपा'मधील अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग ने लक्ष वेधून घेतले.माता अक्का महादेवी यांची भूमिका राजश्री थंळगे यांनी साकारली. महानयोगी अल्लमप्रभू, शिवयोगी सिद्धारमेश्वर ची भूमिकासह 40 महिला कलाकारांनी ने अप्रतिम अभिनय सादर केले. व उपस्थिताचे मने जिकंली.            






व्याख्यानाचे पहिले पुष्प 'बसवण्णांच्या विचारांमधून सामाजिक एकता' या विषयावर व्याख्यान गुमफतांना आज सर्वत्र अशांतता आहे. घरे आणि मनं दुःखाची कुंडं बनत चालली आहेत. मुले संस्कृतीपासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाने आपल्या जीवनात शरण संस्कृती अंगीकारण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या मुलांना बसवण्णा आणि शरणं यांचे वचन व त्यांचा अर्थ शिकवला तर ते आयुष्यात कधीही भरकटणार नाहीत, असे लातूरचे डॉ. भीमराव पाटील यांनी सांगितले. आजची मुले आणि तरुण शहाणे आहेत. ते म्हणाले की, ते शिक्षणाचे कोणतेही क्षेत्र असो, ते वैद्यकीय असो किंवा अभियांत्रिकी, जर त्यांना व्यावसायिक शिक्षणासोबतच शरणची तत्वे आणि वचने शिकवले तर ते आयुष्यात यशस्वी होतील. 






दुसरे पुष्प व्याख्याते डॉ. बी. बी. पुजारी यांनी "सांस्कृतिक नायक बसवण्णा" यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, बसवण्णा हे जगातील एक महान तत्वज्ञानी होते. ते फक्त एका राज्याचे सांस्कृतिक नायक नाहीत. संपूर्ण विश्वाचे नायक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार समजून घेणे आणि ते आज आपल्या जीवनात लागू करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.






कार्यक्रमास दासोह केलेले बसवेश्वर हॉटेलचे मालक चन्नाबसप्पा गुरुभेट्टी आणि जयश्री गुरुभेट्टी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खसगी, सचिव नागेंद्र कोगनुरे,  युवक अध्यक्ष शिवराज कोटगी, अक्कलकोट तालुकाध्यक्ष सचिन कालीबत्ती, सोलापूर अध्यक्ष डॉ.बसवराज नांदर्गी, शशिकला रामपुरे, उ.सोलापूर अध्यक्ष उमेश कल्याणी, वागदरी अध्यक्ष शरणप्पा मंगाणे , बसवराज आलुरे आदी उपस्थितीत होते. 







कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र हौदे, राजशेखर लोकापुरे आदींनी परिश्रम घेतले. मीनाक्षी बागलकोट आणि मीनाक्षी थलंगे  वचन गायले. अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक केले. शिक्षक सुरेश पीरगोंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तर रमेश येणेगुरे आभार मानले.






या मान्यवरांचे जीवन गौरव सत्कार 

सिद्धराम गुरुभेट्टी, परमानंद अलगोंडा, शिवानंद भरले, अमर पाटील, काशिनाथ भतकुनकी, तुकाराम कुदळे, शिवलीला गुड्डोदगी, इंदुमती हिरेमठ, भाग्यश्री सोडगी, गुरुबाळ बगले, संतोष हरकरे. मान्यवरांनी त्यांना बसवांची मूर्ती आणि विभूती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र दिनी ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं दिल्या शुभेच्छा

May 01, 2025 0

 


सोलापूर - १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथील विमानतळावर भेट घेऊन कामगार चळवळींमध्ये सर्वात मोठे योगदान असणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे माझी आत्माकथा पुस्तक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावरील फकीरा पुस्तक भेट देत गुलाब पुष्प देऊन ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.







 याप्रसंगी माणिक कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचा राज्य म्हणून ओळखला जात आहे शेती, उद्योग,व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचे घोडदौड कायम सुरू आहे महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा आपण दृढनिश्चय करूयात असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Read More

कष्टकरी असंघटित कामगारांचा जागतिक कामगार दिनी सन्मान

May 01, 2025 0

 



सोलापूर - १ मे कामगार दिनाचे अवचित्य साधून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व असंघटित कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर  बागवान यांच्या शुभहस्ते सोलापूर शहरातील कष्टकरी असंघटित बांधकाम कामगार यांचा फेटा बांधून गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मोदी येथे आनंदी वातावरणात संपन्न झाला.

     





व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, शहर सरचिटणीस कुमार जंगडेकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, OBC सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, प्रज्ञासागर गायकवाड , तर सचिव दत्तात्रय बनसोडे यांची उपस्थिती होती.





  यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपस्थित कामगार वर्गास शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाचे शहराध्यक्ष मार्तंड शिंगारे व कार्याध्यक्ष संजय सांगळे यांनी आयोजित केला होता.



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश पल्लारे, गोपाळ आरगोट,अशोक गोविंद्लू,सोमनाथ साखरे , श्रीकांत टोणपे यांनी अथक परिश्रम घेतले.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot