Swarajya News Marathi : भाजपा

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label भाजपा. Show all posts
Showing posts with label भाजपा. Show all posts

Wednesday, April 30, 2025

नागरी समस्यांसंदर्भात विभागीय कार्यालयात आंदोलन

April 30, 2025 0


सोलापूर - सोलापूर शहरात विकास काम संथगतीने सुरु असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत. यासाठी आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिले. 

            




विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे, विभागीय कार्यालयाचे सौ. सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न उपायुक्तांसमोर मांडण्यात आले. शहरात पाणीपुरवठा 5 दिवसाआड होत असताना घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, इंदिरा वसाहत, सोना नगर, मुनाळे बोळ, गणेश नगर, दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणीपुरवठा व दूषित पाणीपुरवठा येत आहे. तर काही ठिकाणी पिवळसर पाणीपुरवठा होत आहे.या संबंधित अनेकवेळा तक्रारी देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जोडभावी पेठ परिसरातील स्मार्ट सिटी भागात रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहत असतात. फुटपाथ धुवणे, गाडी धुवणे असे प्रकार सरार्स होत असून पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात यावे. 






या भागात अनेकांच्या घरात बेकायदेशीर नळ कनेक्शन दिले असल्याने पाण्याचा वापर जास्त होत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये ड्रेनेज भरत असून मॅन होल मध्ये गाळ साचले असून ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. विभागीय कार्यालयाच्या वतीने वारंवार सांगुनही साफ सफाई होत नाही. यासह ब्रिटिशकालीन पाण्याचे व ड्रेनेजचे पाईपलाईन गंजलेले व कुजलेले असून त्याची पाहणी करून पाणी व ड्रेनेज लाईन बदलून घ्यावे. रस्त्यावरील लाईट वारंवार बंद पडत आहेत. प्रभाग 3 मध्ये नवीन रस्ते करताना काही भागात अंडरग्राउंड केबल टाकल्याची खात्री करूनच रस्ते करावे. मानवी नगर हैनाळकर पट्टा या भागात दिड वर्षापूर्वी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले होते. त्या भागात निकृष्ट दर्जेचे काम झाल्याने ड्रेनेज व पेव्हर ब्लॉक खराब झाले आहे. सदर काम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून पुनःच काम करून द्यावे. 






प्रभागात झाडूवाले व बिगारी यांचे जागा रिक्त असल्याने प्रभागात कचरा गोळा आहे परंतु मनुष्यबळ कमी असल्याने त्वरित जागा भरण्यात यावे. नागरिकांच्या घरोघरी घन्टागाडी जात नाही. काही भागात 2 दिवसाआड कचरा उचलला जात नसल्याने अनेक नागरिकांनी तक्रारी मांडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी धाकटा राजवाडा ते रूपाभवानी मंदिर रोड पर्यंत नाला साफसफाई करण्यात यावे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये गरीब नागरिक असून त्यांच्या करिता आरोग्य वर्धिनी उभारण्यात यावे. असे एक ना अनेक तक्रारी उपायुक्त आशिष लोकरे यांच्यापुढे मांडण्यात आले. विभागीय कार्यालयातील अनेक जागा रिक्त असून पालिकेच्या वतीने सर्व जागा भरून प्रभागाच्या समस्या सोडवण्यात यावे अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केले. 






यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी 8 दिवसांत सर्व समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संदीप महाले, रवी गड्डम, प्रशांत कलशेट्टी,  शरणु मुडल, माऊली जांभळे, भारत माने, राहुल कांबळे, सिद्राम दासरी, सिद्दु गंधाळकर, रसोलगीकर, प्रथमेश गुल्लापल्ली आदींची उपस्थिती होती.

Read More

Tuesday, April 29, 2025

घरकुल योजना, दुहेरी जलवाहिनी, प्राणी संग्रहालय पुनर्निर्मिती... मंदिराशेजारील शौचालय पाडण्याबाबत आमदारांची आग्रही भूमिका

April 29, 2025 0

 




सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील प्रलंबित विकास कामे आणि नागरी सुविधांबाबत मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या समवेत प्रदीर्घ चर्चा केली. याप्रसंगी शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये घरकुल योजना राबवण्यासाठीचा आराखडा बनविणे, दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करून चाचणी घेणे, धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण तसेच प्राणी संग्रहालय पुनर्निर्मितीची आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील शौचालय पाडून परिसर विकास करावा अशी आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी घेतली.





सोलापूर ते उजनी दरम्यान सुरू असलेल्या दुहेरी जलवाहिनीचे काम केवळ ४०० मीटर अपूर्ण राहिले आहे. हे काम पूर्ण करून येत्या आठवड्यातच या जलवाहिनीची चाचणी घेण्याबाबतच्या सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्या. धर्मवीर संभाजी तलाव पर्यटन विकासाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी आराखडा करण्यात यावा, महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची पुनर्निर्मिती करण्याकरीता सोलापूर महानगरपालिका स्तरावरून प्रयत्न व्हावेत. याकरिता राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.







शहर मध्य मतदारसंघात शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्याच्या जागेवर घरकुल योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सर्वेक्षण करून आराखडा बनविण्याबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली.







ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोर असलेले शौचालय पाडून त्या परिसराचा विकास करावा, अशी आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याशी चर्चा करताना घेतली. त्यामुळे अनेक वर्षांपासून श्री सिद्धरामेश्वर भक्तांची मागणी लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







याशिवाय स्मार्ट सिटीमधील ॲडव्हेंचर पार्कसह इतर विविध कामांची देखभाल दुरुस्ती व्हावी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले. शहरातील स्वच्छतेची योग्य निगा राखण्यासाठी रात्री रस्ते आणि शहर परिसर स्वच्छ करण्याची यंत्रणा पुन्हा सुरू करावी, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.






सोलापूर शहरातील बहुचर्चित मार्कंडेय जलतरण तलावातील समस्यांबाबतही आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मार्कंडेय जलतरण तलाव विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर खुला व्हावा, जलतरणपटूंना स्पर्धांची तयारी करण्यासाठी आवश्यक सुविधा येथे उपलब्ध करून द्याव्यात तसेच जलतरण तलावाचा मक्ता दिलेल्या मक्तेदाराला संपूर्ण वर्षभर तलाव सुरू ठेवण्याच्या सक्त सूचना द्याव्यात असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.







या बैठकीप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागेश खरात, अक्षय वाकसे, संजीव कांबळे, अंबादास सकिनाल, पवन खांडेकर, दिनेश जाधव, अमर शिंदे आदी उपस्थित होते.





तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त रवी पवार, आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, मठपती, गोकुळ चितारे व शर्मिष्ठा सल्ला यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती.

Read More

Monday, April 28, 2025

सोलापूर बाजार समिती निवडणूक मध्ये मनीष देशमुख आणि रामाप्पा विजयी

April 28, 2025 0

 



सोलापूर - सोलापूर बाजार समिती निवडणूक मध्ये मनीष देशमुख 216 मतांनी निवडून आले आहेत तर रामाप्पा हे 195 मतांनी निवडून आले.

यामध्ये एकूण बूथ प्रमाणे पडलेली मते ही अशी


निंबर्गी गणातून 149 पैकी

1) रामप्पा चिवडशेटी सावकार 76

2) मनिष साहेब 92

3) संगमेश बगले 50

4 )गणेश वानकर54

 *आर्थिक दुर्बल घटक*

1) यतीन शहा84

2) सुनिल कळके 58

 *ग्रामपंचायत अनु* 

1) अतुल गायकवाड 82

2)रविद्र रोकडे61




सोलापूर शहर बुथ क्रमांक-1एकूण 77 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-35

देशमुख मनीष-40

पाटील संगमेश-31

वानकर गणेश-31




हमाल-तोलर मतदार संघ...

निवडणूक निकाल

1 ली फेरी

1) विमान.....74

2)कपबशी....164

3)शिटी........1

4)मशीन......110

5)रिक्षा.......====

6) रोड रोलर....2

7)चाक.......92

8)केटली......1

 बाद मते.......43

एकूण मतदान....487

कपबशी 54 मतांनी आघाडी




निंबर्गी बुथ क्रमांक-4एकूण 149 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-76

देशमुख मनीष-92

पाटील संगमेश-50

वानकर गणेश-54





तिर्ह बुथ क्रमांक-2एकूण 117 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-43

देशमुख मनीष-54

पाटील संगमेश-57

वानकर गणेश-65




सोलापूर शहर बुथ क्रमांक-4एकूण 149 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-76

देशमुख मनीष-92

पाटील संगमेश-50

वानकर गणेश-54




आहेरवाडी ग्रामपंचायत

पाहिली फेरी 

चिवडशेट्टी -126

मनीष देशमुख 100




निंबर्गी बुथ क्रमांक-4एकूण 149 पैकी

निंबर्गी येथील सुरेश हसापुरे यांच्या गावातून तेथील बुथवर  सुभाष देशमुख गट आघाडीवर 

चिवडशेट्टी रामप्पा-76

देशमुख मनीष-92

पाटील संगमेश-50

वानकर गणेश-54



आहेरवाडी बुथ क्रमांक-6 एक 167 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-126

देशमुख मनीष-100

पाटील संगमेश-45

वानकर गणेश-21

नारळ आगडीवर




बोरामणी बुथ क्रमांक-8एकूण 149 पैकी

चिवडशेट्टी रामप्पा-59

देशमुख मनीष-62

पाटील संगमेश-97

वानकर गणेश-9


सोलापूर बाजार समितीचा निकाल

*ग्रामपंचायत मतदारसंघातून मनीष देशमुख व रामप्पा चिवडशेट्टी विजयी..*

*मनिष देशमुख:🥥-*636*

*रामप्पा चिवडशेट्टी🥥:-*615*

*संगमेश बगले:☕-472*

*गणेश वानकर:☕-*420*

*पंचाक्षरी स्वामी,(मंद्रूप)*

Read More

वस्ती संपर्क अभियानात भाजपाकडून स्वच्छता

April 28, 2025 0

 



सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत रविवारी विडी घरकुल येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. 






शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शहर उत्तर पूर्व मंडल मधील प्रभाग क्रमांक १, २, ९, १०, ११ येथे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विडी घरकुल परिसरातील मंदिर, हॉस्पिटल, शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच बूथ यात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून संवाद करण्यात आला. याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते, आणीबाणीच्या काळातील मिसाबंदीतील कार्यकर्ते तसेच कारसेवकांचा सन्मान केला.






हे अभियान शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, अनिल कंदलगी, उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, प्रकाश म्हंता, गंगाधर बंडगर, भीमाशंकर लोहार, शेखर इगे, रुचिरा मासम, भास्कर मरगल तसेच सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आदी उपस्थित होते.

Read More

Friday, April 25, 2025

महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांनी कॅम्प आयोजित करण्याचे परिपत्रक काढावे... आ. विजयकुमार देशमुख यांच्या सूचना

April 25, 2025 0

 




सोलापूर - आमदार विजय देशमुख यांच्या उपस्थितीत  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूमी अधीक्षक दादा घोडके व महानगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मठपती यांच्या समवेत गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली. 





मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देशन दिले होते की तत्काळ मोजणी नकाशा व गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण निकाली लावावे व बांधकाम परवाने चालू करण्यात यावे. त्यानुसार येणाऱ्या 8 - 10 दिवसांमध्ये कॅम्पद्वारे महापालिकेने व जिल्हाधिकारींनी परिपत्रक काढावे. तसेच त्यामध्ये अट अशी असेल की कॅम्प मध्ये ज्या नागरिकांचे 7/12 आणि खरेदीखत असेल त्यांची मोजणी त्वरित करून आठवड्याभरात बांधकाम परवाना देण्यात येईल. तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी तत्काळ हे काम लवकरात लवकर सुरुवात करावे असे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.





यावेळी माजी सभागृहनेते शिवानंद पाटील, चेतन पाटील संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

Read More

Wednesday, April 23, 2025

पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून पहेलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध... कायमचा धडा शिकवण्याची गरज

April 23, 2025 0

 


सोलापूर : पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या गोळीबाराचा सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, भारतमाता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा दिल्या. 






यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने कायमच भारतीय सीमांवर दहशतवाद पसरवून देशभरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील अनेक हल्ले भारताने परतवून लावले आहेत. पहेलगाम येथे झालेला हा भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देतील याविषयी खात्री आहे.







यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे भारतीय हिंदू पर्यटकांवर जिहादी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या आहेत. दहशतवाद्यांच्या या कृत्याबद्दल संपूर्ण देशभरासह जगभरातील हिंदूंमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारतीय सैनिकांच्या हत्या, नागरिकांच्या हत्यांच्या रूपाने हिंदुस्थानला हानी पोहचवत आहे. यातून हिंदुस्थानचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे, असेही शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यावेळी म्हणाले.







याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी, उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर चिटणीस बजरंग कुलकर्णी, सुधाकर नराल, मंडल अध्यक्ष देविदास बनसोडे, दत्तात्रय बडगु, नागेश सरगम, नागेश खरात महेश देवकर, माजी मंडल अध्यक्ष गिरीश बत्तूल, अ.जा. मोर्चा अध्यक्ष मारेप्पा कंपली, किसान मोर्चा अध्यक्ष वैभव बिराजदार, महिला मोर्चा प्रदेश सचिवा रंजिता चाकोते, शहर महिला मोर्चा चिटणीस विमल पुठ्ठा, माजी नगरसेवक नगरसेवक संजय कोळी, विनायक विटकर, पदाधिकारी कार्यकर्ते मोहन डांगरे, राजकुमार पाटील, सतीश महाले, गुंडप्पा पाटील, श्रीनिवास पुरुड , आनंद बर्रू चेतन शर्मा, विजय ईप्पकायल, सोशल मिडिया सहसंयोजक अभिषेक भाईकट्टी, संकेत विभुते, माधव चव्हाण आदी उपस्थित होते.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot