सोलापूर - शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांना हिवाळी अधिवेशन मधे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित पाठ, शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्या संदर्भात मागणी मांडावी असे निवेदन देण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन म्हणजे त्यागाचं, बलिदानाचे अद्वितीय उदाहरण आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रेरणा मिळू शकते. महाराष्ट्रातील सुपुत्रांनी कायमच देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांसारख्या एका थोर महापुरुष आणि महापराक्रमी एकमेवाद्वितीय राजाचे जीवन चरित्र महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात, पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हावा अशी प्रखर मागणी आहे त्यासाठी हिवाळी अधिवेशन मधे मागणी मांडावी. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ संस्थापक राम जाधव यांनी केली.
महाराष्ट्रातील अठरापगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यात वाढ केली. त्यामुळे अशा थोर महापराक्रमी राजाचा त्याग नवीन पिढीपर्यंत पोहोचावा अशी आमची मागणी आहे असे उत्सव अध्यक्ष निशांत सावळे यांनी सांगितले.
यावेळी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ कार्याध्यक्ष वीरेश कलशेट्टी, विश्वस्त हरिभाऊ सावंत, अजिंक्य शिंदे , पृथ्वीराज खैरमोडे, उपाध्यक्ष सागर गायकवाड, सुमंत जगदाळे, किरण वाघमारे आदी जण उपस्थित होते.
0 टिप्पण्या