Swarajya News Marathi : महानगरपालिका

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label महानगरपालिका. Show all posts
Showing posts with label महानगरपालिका. Show all posts

Friday, May 2, 2025

"अंतीमसंस्कारा साठी लाकडा ऐवजी गवऱ्याचा वापर करण्याचे आव्हान"

May 02, 2025 0



सोलापूर - ग्रीन क्रेडीट प्रोग्राम अंमलबजावणी नियम २०२३ अंतर्गत कार्बन क्रेडीट कार्यक्रम सोलापूर शहरा व जिल्ह्यांतर्गत असणाऱ्या गोशाळा महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1960, 1976 तसेच सुधारीत अधिनियम 1995 च्या अनुषंगाने 4 मार्च 2015 काय‌द्याची अंमलबजावणी कडकपणे चालू असल्याने पोलिस विभागाकडून न्याय वैदयक गुन्हयात जप्त केलेली जनावरे गोशाळामधे दाखल केली जातात गोवंशाचा ओघ मोठ्या प्रमाणावर गोशाळांकडे वाढला असून गोशाळांची आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सदरची जनावरे संपूर्ण भाकड असतात यां गोमातेचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असून जिक्रीचे बनले आहे.





महाराष्ट्र शासन महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती (मुंबई उच्च न्यायलय व महाराष्ट्र शासन द्वारा गठीत) व जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंध समिती सदस्य श्री केतन भाई शहा यांच्या पुढाकाराने गोशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी राज्यगोमाता चे गोकाष्ट व देशी गवरी विक्रीसाठी उत्पादन सुरु केले आहे. या मुळे संपूर्ण  सोलापूर शहर व जिल्ह्यातील गोशाळा यांना रोजगार निर्मिती व आर्थिक स्वावलंबी होतील व दूध न देणारी (भाकड) गोमातेची व हजारो झाडांची कत्तल थांबण्यास मदत होईल.





त्याकरिता अंतिम संस्कार आणि होळी सणा यासाठी लाकडाऐवजी देशी राज्य गोमाता शेणापासून तयार केलेली गवरी व गोकाष्ठाचा वापर केल्यास कार्बनचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी मदत होईल. स्वालंबन व आर्थिक दृष्ट्या सक्षम गोसंवर्धन संस्था गोशाळेतील दूध न देणारी देशी राज्यगोमातेच्या शेणापासून तयार झालेले गोवरी माणसाच्या अंतविधीसाठी विक्रीकामी सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीच्या दर्शनी भागामध्ये गवर्या विक्रीस उपलब्ध करून देणाऱ्या गोशाळेची  संपर्क साधून अंतिम संस्कारासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी गवऱ्याचा मोठ्या प्रमाणात वापर करा या मुळे हजारो झाडांची व गोमाताची कत्तल थांबण्यास मदत होईल असे आव्हान मा. श्री. केतनभाई शहा केले आहे.





आयुक्त डॉ सचिन ओंबसे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त मा.श्री रवी पवार हे सोलापूर शहरातील  6 गोशाळा च्या नावे परिपत्रक  शिष्टमंडळाला देताना या शिष्टमंडळातील  माननीय श्री केतनभाई शहा (मानद पशु कल्याण अधिकारी) यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष मा श्री शेखरजी मुंदडा साहेबांना राज्यमंत्री यांनी फोन द्वारे अतिरिक्त आयुक्त साहेबांचे आभार मानले यावेळी  सो श्री संदीप कारंजे साहेब व माननीय श्री आशिष लोकरे उपायुक्त साहेबांचे सहकार्य लाभले.





अंतिम संस्कार साठी पर्यावरण पूरक गोशाळेतील देशी राज्यगोमातेच्या शेणापासून पासून तयार केलेल्या गवर्या खालील   उपलब्ध करून देणाऱ्या गोशाळा नावे संतोषी माता गोशाळा, गौमीत्र गोशाळा, आदर्श कामधेनू संशोधन संस्था, तेजामृत गोशाळा, गोधन विकास गोशाळा, खंडोबा सेंद्रिय शेतकरी श्रीराम गोशाळा, शिष्टमंडळा मध्ये डॉ,राजेंद्र गाजूल, परमेश्वर तळेकर, विजय यादव, उमा बिराजदार, संतोष शिर्के, उपस्थित होते,

Read More

Tuesday, April 29, 2025

१०० फुटी भगवा झेंडा बसवा व छत्रपती शिवाजी महाराज चौक संभाजीनगर च्या धर्तीवर सुशोभिकरण करा

April 29, 2025 0

 




सोलापूर - शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना छत्रपती संभाजी महाराज चौक येथे १०० फुटी भगवा झेंडा बसवावा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सुशोभीकरण संभाजीनगर च्या धर्तीवर करण्यात यावा असे निवेदन आणि डिझाईनचा फोटो देऊन मागणी करण्यात आली.

         





छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोलापूर येथून महाराजांच्या पुतळ्या च्या दोनी बाजूने उड्डाण पूल जाणार आहे. सांभाजीनगरला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या च्या दोन्ही बाजूने उड्डाणपूल गेल्यामुळे तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उड्डाणपूल च्या उंचीने घेऊन सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरण करण्यात यावा.

          





आताच उडाणपूलची उंची बगून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या उंचीने बसवून घेऊन सुशोभीकरण करण्यात यावे. जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उड्डाणपुलाच्या खाली बसवून सुशिभिकरण केलात आणि उद्या भविष्यात कदाचीत एकादी दुर्दैव घटना घडली तर महापालिका आयुक्त, नगर अभियंता आणि आर्किटेचर जबाबर राहतील असे मध्यवर्ती महामंडळ संस्थापकअध्यक्ष राम जाधव यांनी सांगितले.

        






यावेळी मध्यवर्ती महामंडळ विश्वस्त पवन आलुरे, राजा गेजगे, राहुल दहीहंडे, नागेश भोसले आदी जण उपस्थित होते.

Read More

Thursday, April 17, 2025

पिंपरी चिंचवड महापालिका स्वच्छता विभागचे ब्रँड अँबेसिडर यांनी सोलापूरच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन

April 17, 2025 0



सोलापूर - सोलापूर महानगरपलिकेच्या वतीने दि. ०३ एप्रिल, २०२५ ते दि. १७ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये मा.आयुक्त यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच झाडूवाला,बिगारी, सफाई कामगार (रोजंदारी व बदली कामगारासह) क्षमता बांधणी कार्यशाळा  दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत घेणेत येत आहे. 





या अनुषंगाने दि.१५/०४/२०२५ रोजी विभागीय कार्यालय क्र.६ कडील सर्व चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी यांची आरोग्य निरीक्षक व मुख्य आरोग्य निरीक्षक यांचेसह म.न.पा.मधील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे कार्यशाळा आयोजित करणेत आली होती. या कार्यशाळेत सर्व सफाई  सेवकांना दैनंदिन वेळेवर उपस्थित राहणे, स्वच्छता, झाडलोट, डिव्हाडरलगत व फुटपाथलगत साचलेली माती काढणे, डिव्हाडरमधील कचरा काढणे, डिव्हाडरमधील वाढलेली झाडे छाटणी करणे, सेवापुस्तक वेळेवर अद्यावत करून घेणे, रजेचे अर्ज वेळेवर जमा करणे इत्यादीबाबत सूचना देण्यात आल्या. सदरची कार्यशाळा दैनंदिन कामकाजामध्ये सुसूत्रता येणेसाठी कार्यशाळा आयोजित करणेत आली होती. 






या कार्यशाळेमध्ये सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे मनोबल वाढविणे तसेच ते करीत असलेल्या चांगले स्वच्छता कामाची त्यांना शाबासकी थाप देणेसाठी, तसेच त्यांना सर्व सुरक्षा साहित्य वापरणे, नागरिकांशी व्यवस्थितपणे संवाद करणे इत्यादी विषयांबाबत सहा.आयुक्त शशिकांत भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल चराटे व संबंधित झोनचे मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक त्यांचे कर्मचा-यांसह  उपस्थित होते. 






याच कार्यशाळेप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडील ब्रँड अँबेसिडर (स्वच्छता विभाग), यशवंत गंगाराम कन्हेरे, वय वर्ष 69 हे देखील उपस्थित होते. यशवंत गंगाराम कन्हेरे, हे त्यांचे दुचाकीवरून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 36 जिल्ह्यांतर्गत प्रवास करीत आहेत. आज त्यांनी या कार्यशाळेत त्यांनी उपस्थित राहून सर्व कर्मचा-यांशी संवाद साधला. या वेळेस त्यांनी कर्मचा-यांना चांगले आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, रोजच्या कामामधील सामाजिक बांधिलकी, सुयोग्य वर्तन, वरिष्ठाचा सन्मान, व्यसनधिनता इत्यादीबाबत मार्गदर्शन केले.



यशवंत गंगाराम कन्हेरे हे अध्यक्ष ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान चिंचवड येथे  मार्गदर्शक म्हणून काम पाहत असून त्यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली आहे. यशवंत गंगाराम कन्हेरे हे बजाज ऑटो पुणे येथून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना शहर स्वच्छतेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले असून उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजामध्ये या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल व शहर स्वच्छ व सुंदर दिसेल असे त्यांनी सांगितले.

Read More

Thursday, April 10, 2025

अनधिकृत पार्किंग बंद करून फ्री पार्किंग करा

April 10, 2025 0





सोलापूर - शहरांमध्ये सध्या लोकसंख्या व वाहनांची संख्या प्रचंड वाढल्या कारणामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न उद्भवत आहे ते पार्किंगच्या नावाखाली नागरिकाकडून लूट केली जात असून त्यांच्या ठेका रद्द करून तात्काळ कारवाई करण्यात यावी व पे पार्किंगच्या ऐवजी नागरिकांना फ्री पार्किंग करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे वतीने  सोलापूर महानगरपालिका उपायुक्त तैमूर मुलांनी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 




सोलापूर शहरातील मोठमोठे इमारती बांधकाम परवाना देताना त्यांना पार्किंगची जागा राखीव ठेवणे आवश्यक असताना सुद्धा अनेक इमारतींना पार्किंगची सोय नाही पार्किंगची जागा व्यवसायिक दराने दुकाने थाटलेले आहेत त्याकडे बांधकाम परवाना देताना अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारातून याकडे दुर्लक्ष केले जात तसेच शहरातील काही ठिकाणी महानगरपालिकेच्या  वतीने पे पार्किंग चा ठेका देण्यात आलेल्या आहे तो ठेका संपून सुद्धा अद्यापही पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून आर्थिक लूट केली जात आहे यास महानगरपालिकेतील काही अधिकारी जबाबदार आहेत.





सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटी समावेश करण्यात आला व सोलापुरातील काही रस्त्यांची काम करण्यात आले त्यामध्ये रस्ते अरुंद करण्यात येऊन फुटपाथ मोठे करण्यात आलेले आहेत आणि त्या फुटपाच्या वापर काही लोक व्यवसायिक म्हणून अतिक्रमण केलेले दिसून येते सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग याकडे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे सध्या अतिक्रमण विभाग हा नावालाच राहिलेला आहे कधीतरी एखादी कारवाई करायची आणि बाकी शांत बसायचे कारवाई मध्ये सातत्य नसल्याने सोलापूरचे अतिक्रमण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे तरी आयुक्त साहेबांनी या संबंधित गोष्टीकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.





यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव शहर शहराध्यक्ष शिरीष जगदाळे सचिव सिद्धाराम सवळे शहर संघटक सतीश वावरे दिलीप निंबाळकर अभिषेक जागीरदार आदी उपस्थित होते

Read More

Tuesday, April 8, 2025

प्राणी संग्रहालय आणि छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरनसाठी NTPC कडून CSR फंड मिळावा

April 08, 2025 0




 सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी NTPC थर्मल प्लांटला भेट दिली.यावेळी NTPC चे महाप्रबंधक बीजेसी शास्त्री कार्यकारी संचालक यांनी आयुक्त याचं पुष्पगुछ देऊन स्वागत केले. प्रथम NTPC चे महाप्रबंधक यांनी NTPC संदर्भात माहिती दिले.देगाव येथील 75 एम एल डी मलनिसारण केंद्र असून त्या ठिकाणी 25 एम .एल .डी. पंप पाऊस, 50 एमएलडी पंप पाऊस, प्रायमरी युनिट, सेकंडरी युनिट, क्लोरीन कॉन्टॅक्ट टॅंक, सोलार पावर प्लांट,बायोगॅस जनरेशन युनिट, सांडपाणी तपासणी प्रयोगशाळा. तसेच मलनिसारण केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार पद्धती व द्वितीय उपचार पद्धती करण्यात येतात. महानगरपालिकेच्या देगाव येथे 75 एम एल डी  क्षमतेचे मला निसरण केंद्र असून. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मलनिसरण केंद्रामध्ये सांड पाण्यावर प्रक्रिया करून दररोज मलनिसरण केंद्रामधील लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणारा सांडपाण्याची प्रक्रिया केली जाते.





देगाव स्थित मलनिस्सारण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यात आलेले पाणी एनटीपीसीला पुरविण्यात आल्यानंतर पाण्याचा पुनर्वापर योग्य प्रकारे केला जाऊ शकतो. देगाव मध्ये मलनिसारण केंद्र येथे प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्याच्या बदल्यामध्ये एनटीपीसी द्वारे त्यांची 72 एम एल डी क्षमतेची पाईपलाईन सोलापूर महानगरपालिकेत हस्तांतरित झाल्यास सोलापूर शहराची पाण्याची भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यास मदत होईल. 






या सदर्भात चर्चा करण्यात आले. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय मोठा असून या ठिकाणी प्राणी संग्रहालय सुरु करणायच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण करण्यात येत असून त्या ठिकाणी आपण NPTC थर्मल पावर कडून आपल्या सी.एस.आर फ़ंडातुन सहकार्य करावे.





यावेळी बैठकिस अतिरिक्त आयुक्त रवि पवार,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, NTPC चे के. एम बेबी,नवीन कुमार अरोरा, मनोरंजन सारंगी सर्वजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे, रामचंद्र पेंटर, राहुल शिंदे नागपूर येथील डी आर ए कन्सल्टन्सी चे प्रतिनिधी मेहुल रानडे, रितेश रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More

दाराशा प्रसुतीगृह येथे अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचे उदघाट्न गरोदर मातांच्या हस्ते

April 08, 2025 0





सोलापूर - दि. ०७/०४/२०२५ रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून हॅलो मेडीकल फाऊंडेशन, अणदूर व अलायवस लाईफ सायन्सेस यांच्यावतीने कार्पोरेट सामाजिक उत्तर दायित्व निधीतून सोलापूर महानगरपालिका अंतर्गत दाराशा प्रसुतीगृह येथे गर्भवती महिलांच्या तपासणीसाठीची अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन देण्यात आली. सदर मशीनचे लोकार्पण उपस्थित तीन गरोदर माता यांच्या हस्ते करण्यात आले.





याप्रसंगी हॅलो मेडीकल फाऊंडेशन, अणदूर या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. क्रांति रायमाने तसेच अलायवस लाईफ सायन्सेसचे कार्यक्रम व्यवस्थापक प्रशांत कांबळे सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे, सहा, आयुक्त गिरिश पंडित, आरोग्याधिकारी, डॉ. राखी माने, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सो.म.पा. शहर कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. अतिश बोराडे, दाराशा प्रसुतीगृहाच्या वैद्यकीय अधिकारी, डॉ. रेणूका लहांडे तसेच कर्मचारी वृंद व  लाभार्थी महिला उपस्थित होते.




सदर लोकार्पण प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी श्री. आशिष लोकरे, यांनी जास्तीत जास्त गरजू गरोदर महिलांनी सोलापूर महानगरपालिकेच्या सदर अत्याधुनिक दाराशा प्रसुतीगृहा कडील मशीनच्या माध्यमातून मोफत तपासणी करुन घ्यावी व  सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot