सोलापुर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. १९/०४/२०२५ व दि. २०/०४/२०२५ रोजी भव्य अशी मिरवणूक सोलापूर शहरातून काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सोलापूर शहरातील विविध भागातील मंडळ हे मिरवणूकीमध्ये मोठ-मोठे देखावे डेकोरेशनच्या गाड्या घेऊन मध्यवर्ती मंडळास सहभागी होत असतात. तरी हत्त्तूर वस्ती, अमराई, देगांव, न्यू लक्ष्मी चाळ, थोबडेवस्ती साठे-पाटील वस्ती, लक्ष्मीनगर, गंगानगर, अलंकापुरी नगर, दमाणी नगर येथून अंदाजे २० ते २५ मंडळे मरिआई चौक ते लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) मार्गे मिरवणूकीमध्ये मंडळे सामील होत असतात. त्यामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतचे मोठ-मोठे देखावे (डेकोरेशन) है घेऊन मिरवणूकीत सहभागी होत असतात.
आपल्या कार्यालयामार्फत अण्णाभाऊ साठे चौकामध्ये पुलावरून येजा करणाऱ्या जड वाहतूक होऊ नये याकरिता घालण्यात आलेले गर्डर (लोखंडी कमान) हे मिरवणूकीस अडथळा होत आहेत. या कमानीमुळे सदर परिसरातील मंडळांना मिरवणूकीमध्ये सामील होण्यासाठी देगांव मार्ग पुणे नाका येथे मंडळाच्या देखाव्याच्या गाड्या घेऊन यावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचे कोंडीचे प्रमाण वाढणार आहे. आपण दि. १९/०४/२०२५ रोजी सकाळी ११ वा ते २१/०४/२०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत गर्डर (लोखंडी कमान) काढून घेण्यात यावी जेणेकरून मंडळांना अडथळा होणार नाही.
तरी आपण सदर कमान काढून घेतल्यास तेथील अंदाजे २० ते २५ मंडळाची गैरसोय टळेल. मंडळांना मिरवणूकीत सामील होता येईल.
अशा प्रकारचे निवेदन बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने रेल्वे डी.आर. एम.ऑफिस येथील वरिष्ठ वाणिज्य अधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बाळासाहेब वाघमारे, आनंद चंदनशिवे, मिलिंद प्रक्षाळे, विकी शेंडगे, रॉकी बंगाळे, अजित बनसोडे, अशितोष नाटकर, विनोद वाघमारे, अविनाश भडकुंबे, दत्ता शिंदे, चंद्रकांत सोनवणे, लखन भंडारे, उमेश रणदिवे, विनोद वाघमारे, पंकज ढसाळ, चेतन भडकुंबे, अजय कांबळे, नितीन ओव्हाळ, रियाज दिना मेंबर, बाळासाहेब बनसोडे, दीपक गवळी, अमोल कदम, भीमा मस्के, रवी बनसोडे जयराज सांगे तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातील पदाधिकारी व बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment