सोलापूर - राज्यातील सर्व महाविद्यालयीन व विद्यापीठातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 250 रुपये प्रमाणे धुलाई भत्ता मिळत होता. तो विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने अचानक बंद करून 50रुपये केला आहे. तो पूर्वीप्रमाणे मिळावा, अशी मागणी कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, खजिनदार राहूल कराडे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर व सिनेट सदस्य ए.बी. संगवे यांनी केली आहे.
ऑक्टोंबर 2024 पासून दरमहा वेतनात या कर्मचाऱ्यांना 50 रुपयेवरून 250 रुपये धुलाई भत्ता मिळत होता. परंतु मार्च 2025 पासून तो बंद करण्याचा फतवा येथील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने काढला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मार्च 2025च्या वेतनासही विलंब झाला आहे. याबाबत विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयास संपर्क साधला असता हा निर्णय फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असल्यामुळे तो बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
युनियन आंदोलन छेडणार ः दत्ता भोसले
शासनाच्या सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 250 रुपये धुलाई भत्ता मिळतो. मग महाविद्यालय व विद्यापीठ कर्मचाऱ्यावर अन्याय का? हा भत्ता पूर्ववत न झाल्यास याविरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment