सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यास रक्कम रु.687.86 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे. सदर योजनेंतर्गत घटक ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, सुटटी फुले, मसाला पिक, मानांकन रोपवाटीका स्थापन करणे, स्ट्रॉबेरी, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, मधुमक्षिक वसाहत, ट्रॅक्टर पावर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त, फार्मगेट पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण इत्यादी तसेच औषधी व सुगंधी वनस्पती लागवड अंतर्गत घटकांचा समावेश आहे.
लाभार्थी निवडीचे निकष:- लाभार्थी शेतक-यांच्या नावे स्वतःची शेत जमिन असणे आवश्यक आहे. शेतकरीकडे फलोत्पादन (फळे, भाजीपाला, फुले व इतर इ.) पिके असणे आवश्यक आहे.
तरी जिल्हयातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व शेतक-यांना आवाहन करण्यात येते की,सदर घटकांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेल. अधिक माहितीसाठी संबंधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा