शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती उद्घाटन - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

गुरुवार, २२ मे, २०२५

शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती उद्घाटन

 


सोलापूर : शिवसेना उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी नव्याने  उभारलेल्या शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ गुरुवार दि. 22 मे रोजी सकाळी 10:30 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

        






विजापूर रोडवरील सैफुल चौकात शिवालय शिवसेना जिल्हा व युवा सेना मध्यवर्ती कार्यालय साकारण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. दिलीप सोपल, कैलास पाटील प्रवीण स्वामी, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, माजी आ. शिवशरण पाटील, उपनेते शरद कोळी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, अजय दासरी, धनंजय ढिकोळे, संभाजी शिंदे, सिद्धाराम शीलवंत, लक्ष्मण जाधव, भीमाशंकर म्हेत्रे, प्रिया बसवंती, राजू बिराजदार, सि‌द्धाराम होनमोरे आणि पूजा खंदारे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

       





आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे शिवसैनिकाला मार्गदर्शन यावेळी करणार आहेत. सोलापूर शहर - जिल्ह्यातील शिवसैनिकांना हक्काचे कार्यालय असावे अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. परगावहून येणाऱ्या शिवसैनिकांना पक्षाशी आणि जिल्हाप्रमुखांशी समन्वय साधण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे.

        




या पत्रकार परिषदेस शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, खंडू सलगर, कृष्णा सुरवसे,  संतोष घोडके आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot