सोलापूर - सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे मंगळवार दि. 6 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दि. 6 मे 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता चौंडी येथून बार्शी, जि.सोलापूरकडे प्रयाण, सायंकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह, बार्शी येथे आगमन व राखीव, सायंकाळी 6.00 वाजता शिवाजी प्रसारक मंडळ, (ट्रामा युनिट) बार्शी येथे सदिच्छा भेट, सायंकाळी 6.20 वाजता बार्शी येथून कांदलगाव, ता.बार्शीकडे प्रयाण, सायंकाळी 6.30 वाजता कांदलगाव येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्ते विकास कामाच्या शुभारंभास उपस्थिती, सायंकाळी 6.50 वाजता कांदलगाव येथून बार्शीकडे प्रयाण, सायंकाळी 7.00 वाजता बार्शी येथे आगमन व भक्तनिवास भूमिपूजन समारंभास उपस्थिती, रात्री 8.00 वाजता भगवंत महोत्सवास उपस्थिती, रात्री 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह, बार्शी येथे राखीव, रात्री 10.15 वाजता बार्शी येथून कुर्डूवाडी, जि.सोलापूरकडे प्रयाण, रात्री 11.00 वाजता कुर्डूवाडी रेल्वे जंक्शन येथे आगमन व राखीव, रात्री 11.30 वाजता सिध्देश्वर एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment