Swarajya News Marathi : सामाजिक

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Tuesday, May 13, 2025

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ स्वबळावर लढणार महानगरपालिका

May 13, 2025 0



सोलापूर - चालकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  केली. 






चालकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी महानगरपालिका निवडणुका लढवणार आहे. तसेच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे वीस उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धारही रियाज सय्यद यांनी केला आहे. सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आपला ४ था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. 






प्रारंभी भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश महासचिव प्रदीप शिंगे यांनी प्रस्तावित केले.महासंघाचे प्रदेश मीडिया प्रमुख इलियास सिद्दिकी यांनी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. महासंघ मजबूत करण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये एकजूट असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इलियास सिद्दिकी यांनी केले.

        






गेल्या चार वर्षांत संघटनेने वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष  रियाज सय्यद यांनी आपल्या भाषणात, "वाहतूक क्षेत्रातील कामगारांचे हित जोपासणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केले. तसेच, भविष्यातील योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली. दरम्यान वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महासंघाचे सभासदत्व स्वीकारलेल्या नवीन रिक्षा स्टॉपच्या अध्यक्षांचा सत्कारही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.






याप्रसंगी मंचावर रियाज सय्यद,लाडजी नदाफ, हजरत शेख,अल्लाहबाक्ष शेख,देविदास कोळी, इलियास सिद्दीकी, सिदगणे,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव प्रदीप शिंगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप शिंगे,इरफान कल्याणी,इम्रान शेख,तुफान शेख,अकील शेख,नागेश वाघमारे,शंकर राऊत, मिन्हाज बागवान,कलीम हुंडेकरी,रमेश बनसोडे,गौस शेख,आसिफ शेख,फयाज काझी,फिरोज तांबोळी, खाजा अमीन पटेल, अलीशेर पटेल,मल्हार शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Read More

Monday, May 12, 2025

वैशाख पौर्णिमेनिमित्त लहान मुलांना मिठाईवाटप

May 12, 2025 0



सोलापूर - प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर येथे आज सकाळी 10.00 वाजता. महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर उपस्थितांच्या हस्ते पुष्प वाहून व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गौतम इंगळे व भारत बाबरे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून वैशाख पौर्णिमा साजरी करण्यात आली.

        




यावेळी प्रथमतःसामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी श्रीमंत जाधव यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप)चे प्रमुख मार्गदर्शक तथा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त भारत देशवासी यांना मंगलमय शुभेच्छा दिली.

   





यानंतर वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या वतीने लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आले.

    




यावेळी  आरोग्य निरीक्षक जमादार,पी.बी. ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड, ॲड. विशाल मस्के, अरविंद गायकवाड, चंद्रकांत सोनवणे, गोपीनाथ जाधव, धीरज वाघमोडे, यशराज डोळसे,सुधीर वाघमोडे, अक्षय मस्के, आदित्य चंदनशिवे, धोंडीबा कापुरे , अजय इंगळे ,गोविंद राजगुरू,शिरीष गायकवाड, अमोल कुंदुर, अजित जाधव, शुभम कांबळे, सिद्धू तळभंडारे ,प्रमोद साबळे, नंदू जाधव, सचिन घोडके, सतीश अडाकूल, प्रसन्न तळभंडारे, राहुल बागले,जयराज सांगे, रोहन तळभंडारे, निखिल शिंदे, हरी बचुवार , रविंद्र गवळी इत्यादी उपस्थित होते.

Read More

Thursday, May 8, 2025

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेविरुध्द पवार यांची तक्रार

May 08, 2025 0


सोलापूर - योगेश पवार यांनी लोकसभेवेळी फॉर्म भरल्याची खुन्नस ठेवून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सूडभावनेतून धमकीवजा भाषा वापरुन योगेश पवार यांचेशी असभ्य वर्तन करून अपमानास्पद वागणूक दिली. व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून जबरदस्तीने कक्षाबाहेर काढले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकाराचा गैरवापर करून सूडभावनेतून योगेश पवार यांस शारीरिक व मानसिक त्रास दिला व प्रशासकीय धोरणाविरुद्ध कर्तव्याचा दुरुपयोग केला. म्हणून कुमार आशीर्वाद यांचेविरुध्द योगेश पवार यांनी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हा न्यायाधीश, पुणे विभागीय आयुक्त व पोलिस आयुक्त यांचेकडे विडिओ पुराव्यासह लेखी तक्रार केली आहे. 






याबाबत सविस्तर हकीकत अशी की.., योगेश पवार हे शर्तभंगबाबतच्या एका सुनावणीसाठी दिनांक 08 मे 2025 रोजी दुपारी 12 – 15 वाजता, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे कार्यालयात गेले होते. सुनावणीनंतर बाहेर जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला बोलवत आहेत. म्हणून तेथील महसूल कर्मचारी अविनाश स्वामी यांनी पवार यांस आवाज दिला. तेव्हा आंत येवू का, असे विचारून पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे हावभाव एखाद्या गुंडासारखे होते व ते खुन्नस देवून सूडभावनेतून बघत होते. 






आणि तू लोकसभेवेळी अर्ज दाखल केलेला योगेश पवारच आहे ना? माझ्यापुढे तुझी स्टंट बाजी चालणार नाही, असे म्हणून धमकीवजा वजा असभ्य व अपमानास्पद भाषा वापरुन इसको बाहर निकालो असे म्हणून बळाचा व पदाचा गैरवापर करून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून योगेश पवार यांस जबरदस्तीने  कक्षाबाहेर काढले. त्यामुळे योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेविरुध्द तक्रार दिली आहे. 






जिल्हाधिकारी यांचेविरुध्द तक्रार दिल्यामुळे प्रशासनाकडून योगेश पवार यांच्या जीवित्तास धोका असून खोट्या केसेस होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांचे दबावाखाली जर खोट्या केसेस झाल्यास त्यांच क्षणी मी आत्मदहन करून जीव देणार असल्याचा इशारा योगेश पवार यांनी दिला.

Read More

Tuesday, May 6, 2025

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच शाहीर माने यांचे फोक आख्यान

May 06, 2025 0



सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या जयंती निमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने १२ मे रोजी सायंकाळी ६.३० वा शिंदे चौक येथे शाहीर चंद्रकांत माने यांच फोक आख्यान आयोजन केल आहे 





त्यानुसंगाने शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेळबोडे व सर्व पत्रकार बांधवाना,वअतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी उपमहापौर नाना काळे यांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देऊन कार्यक्रमाची तयारी करण्यास सुरुवात करण्यात आली.





यावेळी मध्यवर्ती महामंडळ संस्थापक अध्यक्ष राम जाधव, उत्सव अध्यक्ष निशांत साळवे, उत्सव उपाध्यक्ष सॅम पतंगे, विश्वस्त हरि सावंत, सोहन लोंढे, आतिश बनसोडे, संदीप चेळेकर, सूरज पाटील, राज सलगर, पवन आलुरे, राहुल दहीहंडे, अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते.

Read More

श्री वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जळीत कुटुंबग्रस्तास आर्थिक मदत

May 06, 2025 0

 



              

सोलापूर - दक्षिण सोलापूर मधील विंचूर येथे   काल दुपारी अचानक गॅस स्पोट होऊन फुलारी कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. गोर गरीब गरजू लोकांसाठी काम करणारी श्री वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने फुलारी कुटुंबास रोख १५०००/- (पंधरा हजार) रुपये बंद पाकीट देऊ करण्यात आले.






यावेळी श्रीशैल चडचण, शिवानंद बगले, अनिल थोरात, कुमार कोणदे, मल्लिकार्जुन झाडबुके , नागेश फुलारी, दशरथ कोळी, सोमनिंग कोळी, अजय व्हनमाने , वाघेश सगरे व गावकरी उपस्थित होते. 






नियमितपणे गोरगरिबांच्या संकटात धाऊन जाणारी ही निर्व्यसनी तरुण मुलांची संस्था गेली चार वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात गोर गरीब गरजु संकटग्रस्त लोकांसाठी काम करत आहे.

Read More

Friday, May 2, 2025

"वाचू संविधान बारा तास" स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

May 02, 2025 0



सोलापूर - डाॅ. वै. स्मृ. शा. वैद्यकीय महाविद्यालय व महाकारुणिक एज्युकेशनल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मा. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १८ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या "वाचू संविधान बारा तास" स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि. १ मे २०२५ रोजी पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे मा. उपअधिष्ठाता डाॅ. दिपक बनसोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. पोलिस आयुक्त सोलापूर शहर श्री. एम. राजकुमार व मा. डाॅ. अग्रजा चिटणीस-वरेरकर वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, श्री. छ.शि.म.स. रुग्णालय सोलापूर हे उपस्थित होते.




कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. पृथ्वीचे वाढते तापमान पाहता दीप प्रज्वलन न करता रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.






स्पर्धेचा निकाल व पारितोषिक खालील प्रमाणे -

पुरुष गट

१) कालकथित गोपीनाथ महादेव डावकर यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक रु. १००००/- व सन्मानचिन्ह - विवेक जैन ८६ गुण

२) दिवंगत आकाश जोगदंड यांच्या स्मरणार्थ, द्वितीय पारितोषिक- रु. ५०००/- व सन्मानचिन्ह - स्वप्नशिल भडकुंबे ८२ गुण

३) आयु. विजया नारायण डांगे यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक रु. ३०००/- व सन्मानचिन्ह - शुभम मोहिते ८० गुण






४) कालकथित अर्जुन कृष्णा खरे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १०००/- व सन्मानचिन्ह -

अश्विन कुमार साबळे ७८ गुण 

राहुल मिश्रा ७४ गुण 

प्रतीक उग्रल ७४ गुण 

पंकज गायकवाड ७२ गुण

८) स्वर्गीय वंदना राजन शिंदे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १०००/- व सन्मानचिन्ह - चेतन कोनापुरे ६८ गुण





महिला गट-

१) भिक्खुणी तेनझीन स्तोकी आणि भिक्खुणी तेनझीन डोलकर समृद्धी वाघमारे यांच्या सौजन्याने प्रथम पारितोषिक रु. १०००/- व सन्मानचिन्ह - मयुरी भालेदार ८० गुण


२) डॉ. एस. बी. क्षीरसागर, प्राचार्य, डी. पी. बी. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांच्या सौजन्याने द्वितीय पारितोषिक रु. ५०००/- व सन्मानचिन्ह - सरस्वती कांबळे ७६ गुण


३) आयु. विद्या सुरेश रोडे यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक रु. ३०००/- व सन्मानचिन्ह - अनुजा गायकवाड ६८ गुण






४) श्री. बाळासाहेब भगवान कदम यांच्या सौजन्याने उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १०००/- व सन्मानचिन्ह - 

पूजा सपकाळ ६६ गुण 

वैष्णवी चाबुकस्वार ५८ गुण 

प्रीती सूर्यवंशी ५६ गुण 

वैष्णवी लोखंडे ५४ गुण




८) स्वर्गीय वंदना राजन शिंदे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक रु १०००/- व सन्मानचिन्ह - गायत्री राजगुरू ५२ गुण






याशिवाय कालकथित साधना नेमिनाथ मस्के यांच्या स्मृती प्रित्यर्थ व डॉ. अविनाश घोरपडे यांच्या सौजन्याने, विहान भालेराव, समृद्धी वाघमारे, विरासत थोरे, ऋतुजा सोनवणे, महेंद्र कांबळे अशा वयोगट नऊ ते पंधरा मधील चिमुकल्यांना आणि आशा शिवशरण, शारदा गजभिये, प्रा. डॉ. विजया काकडे, सुरेखा साबळे व तुषार मोरे यांना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.





पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी संविधान वाचन ही नुसती स्पर्धा न राहता चळवळ होणे गरजेचे आहे. मिरवणुकीत डॉल्बीवर पैसे खर्च न करता अशा प्रकारचे विधायक व समाज उपयोगी कार्यक्रम करावेत असे प्रतिपादन करून सर्व स्पर्धकांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.





डॉ. अग्रजा चिटणीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीअशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार आयोजित होणे गरजेचे आहे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात उपाधिष्ठाता डॉ. दीपक बनसोडे यांनी संविधान वाचनाच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचे व स्पर्धकांचे कौतुक केले तसेच अशा प्रकारच्या शैक्षणिक व विधायक कार्यक्रमांमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढत आहे असे प्रतिपादन केले. 





कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या डॉ. श्रेया सोनवणे डॉ. शाझिया हसीब खान, डॉ. शबरीश जी. एम., डॉ. कुमार प्रसाद, डॉ. अस्मिता मस्के, श्रीमती नंदा काटे व श्री. राजेश मोरे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. औदुंबर मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड. रवी गजधाने यांनी मांनले.





कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सर्वेश कदम, डॉ. शुक्लधन रोडे, डॉ. संचित खरे, डॉ. अवधूत डांगे, ऍड. अमित कांबळे, श्री. प्रवीण सोनवणे, अशोक मस्के, आनंद शिंदे व अमोल वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

Read More

कुचन प्रशालेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

May 02, 2025 0

 




सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य युवराज मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदना देण्यात आली.






याप्रसंगी प्राचार्य युवराज मेटे यांनी अध्यक्षीय मनोगतातून महाराष्ट्राच्या निर्मितीला उजाळा देत महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले त्यासोबत कामगारांच्या न्याय हक्काच्या सन्मानासाठी असणाऱ्या कामगार दिनाचा इतिहास सांगितला.






या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका कविता गेंगाणे यांनी केले.

Read More

Thursday, May 1, 2025

अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग सदाबहार संपन्न

May 01, 2025 0

 



सोलापूर-  महात्मा बसवेश्वर महामंडळ, विजापूर रोड आणि जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने   ओम गर्जना चौक,सवेरा नगर सैफुल येथे बसव जयंतीनिमित्त आयोजित एका विशेष व्याख्यान आणि जीवनगौरव -सन्मान समारंभाचे प्रथम श्रेणीचे सरकारी कंत्राटदार परमानंद अलगोंडा पाटील यांनी बसवण्णाच्या प्रतिमेला प्रार्थना करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जागतिक लिंगायत महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. 






व्यासपीठावर माजी आमदार शिवशरण पाटील, डॉ. शरणबसव हिरेमठ, शिक्षक नेते सूर्यकांत भरले व वीरभद्र यादवाड , शासकीय कंत्राटदार रेवणसिद्ध बिज्जरगी, चन्नबसप्पा गुरुभेट्टी, जागतिक लिंगायत महासभाचे अध्यक्ष शिवानंद गोगाव ,माजी विस्तार शिक्षणधिकारी अशोक भांजे,  सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण चलगेरी, नामदेव फुलारी, महिला अध्यक्षा राजेश्री थलंगे,आदी उपस्थित होते.              







शंकरलिंग महिला मंडळ आणि जागतिक लिंगायत महासभेच्या महिला सदस्यांनी सादर केलेल्या 'अनुभव मंडपा'मधील अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग ने लक्ष वेधून घेतले.माता अक्का महादेवी यांची भूमिका राजश्री थंळगे यांनी साकारली. महानयोगी अल्लमप्रभू, शिवयोगी सिद्धारमेश्वर ची भूमिकासह 40 महिला कलाकारांनी ने अप्रतिम अभिनय सादर केले. व उपस्थिताचे मने जिकंली.            






व्याख्यानाचे पहिले पुष्प 'बसवण्णांच्या विचारांमधून सामाजिक एकता' या विषयावर व्याख्यान गुमफतांना आज सर्वत्र अशांतता आहे. घरे आणि मनं दुःखाची कुंडं बनत चालली आहेत. मुले संस्कृतीपासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाने आपल्या जीवनात शरण संस्कृती अंगीकारण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या मुलांना बसवण्णा आणि शरणं यांचे वचन व त्यांचा अर्थ शिकवला तर ते आयुष्यात कधीही भरकटणार नाहीत, असे लातूरचे डॉ. भीमराव पाटील यांनी सांगितले. आजची मुले आणि तरुण शहाणे आहेत. ते म्हणाले की, ते शिक्षणाचे कोणतेही क्षेत्र असो, ते वैद्यकीय असो किंवा अभियांत्रिकी, जर त्यांना व्यावसायिक शिक्षणासोबतच शरणची तत्वे आणि वचने शिकवले तर ते आयुष्यात यशस्वी होतील. 






दुसरे पुष्प व्याख्याते डॉ. बी. बी. पुजारी यांनी "सांस्कृतिक नायक बसवण्णा" यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, बसवण्णा हे जगातील एक महान तत्वज्ञानी होते. ते फक्त एका राज्याचे सांस्कृतिक नायक नाहीत. संपूर्ण विश्वाचे नायक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार समजून घेणे आणि ते आज आपल्या जीवनात लागू करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.






कार्यक्रमास दासोह केलेले बसवेश्वर हॉटेलचे मालक चन्नाबसप्पा गुरुभेट्टी आणि जयश्री गुरुभेट्टी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खसगी, सचिव नागेंद्र कोगनुरे,  युवक अध्यक्ष शिवराज कोटगी, अक्कलकोट तालुकाध्यक्ष सचिन कालीबत्ती, सोलापूर अध्यक्ष डॉ.बसवराज नांदर्गी, शशिकला रामपुरे, उ.सोलापूर अध्यक्ष उमेश कल्याणी, वागदरी अध्यक्ष शरणप्पा मंगाणे , बसवराज आलुरे आदी उपस्थितीत होते. 







कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र हौदे, राजशेखर लोकापुरे आदींनी परिश्रम घेतले. मीनाक्षी बागलकोट आणि मीनाक्षी थलंगे  वचन गायले. अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक केले. शिक्षक सुरेश पीरगोंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तर रमेश येणेगुरे आभार मानले.






या मान्यवरांचे जीवन गौरव सत्कार 

सिद्धराम गुरुभेट्टी, परमानंद अलगोंडा, शिवानंद भरले, अमर पाटील, काशिनाथ भतकुनकी, तुकाराम कुदळे, शिवलीला गुड्डोदगी, इंदुमती हिरेमठ, भाग्यश्री सोडगी, गुरुबाळ बगले, संतोष हरकरे. मान्यवरांनी त्यांना बसवांची मूर्ती आणि विभूती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

Read More

Wednesday, April 30, 2025

गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवसा निमित्त स्टॉलचे उदघाटन

April 30, 2025 0



सोलापूर - 30 एप्रिल 2025 हा दिवस राज्यात गोमय उत्पादन विक्री दिवस साजरा करावयाचा आहे. यामध्ये  पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गोमय मुल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस आदर्श कामधेनु संशोधन संस्था संचलित कट्टेव्वादेवी गोशाळेचे गोमय उत्पादन विक्री  स्टॉलचे उद्घाटन समारंभ  मा. आमदार सुभाष देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी केतनभाई शहा (भारतीय जैन संघटना राज्य अध्यक्ष), गोशाळेचे अध्यक्ष उमा बिराजदार, रुद्रप्पा बिराजदार, केमचे श्री परमेश्वर तळेकर ,येवले, (सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त) ह.भ.प. अभिमन्यू डोंगरे महाराज जिल्हाध्यक्ष  विश्व हिंदू परिषद, सोलापूर.) महेश भंडारी, (अध्यक्ष, सोलापूर गोसेवा महासंघ) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. 






या वेळी गोभक्त, गोसेवक, गोरक्षक उपस्थित राहून गोमातेच्या गोशाळांनी सहभाग नोंदवला नजीकच्या एसटी बस स्थानकावर दिनांक 30.04.2025 रोजी पूर्ण दिवसभर त्यांच्याकडील गोमय उत्पादनाचा (स्टॉल) लावायचा आहे. त्याची प्रसिद्धी व विक्री करून उत्पादने किती चांगली आहे याबाबत स्थानकावर आलेल्या प्रवाश्यांना सविस्तर माहिती द्यावयाची आहे. सदर बाब केल्याने गोमय उत्पादनांची उत्कृष्ट अशी प्रसिद्धी होईल व गोशाळेला अर्थाजन होण्यास मदत होईल व त्या मुळे भाकड गोवंश हे कत्तलखान्या मध्ये जाणार नाहीत,तसेच शेतकरी सुद्धा आपले गोवंश हे कसाईना विकणार नाही,,

Read More

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त जी.एम संस्थे तर्फे सामुदायिक बुद्ध वंदन घेऊन अभिवादन

April 30, 2025 0

 



 सोलापूर - जगत ज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वर चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जी.एम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख व सामाजिक कार्यकर्ते जी.एम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन दीप प्रज्वलित करून समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 







या प्रसंगी बोलताना जी.एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की  12व्या शतकातील, महान संत, जगदज्योति, समतानायक, महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंटप नावाचे व्यासपीठ तयार करून या व्यासपीठाच्या साह्याने  कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माची मुक्तता करण्यासाठी तसेच त्याला व्यवहारिक  व लोकशाही विश्वधर्माचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं  त्या काळी धार्मिक, सामाजिक, आर्थिक जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली त्याचप्रमाणे जातीभेद व अनिष्ट रूडी परंपरेला कडाडून विरोध केला 





आशा हया महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था  संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते जीएम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आप्पासाहेब गायकवाड नरेंद्र शिंदे कुंदन वाघमारे नरेश कदम अजय कोळेकर मॅडी दुपारगुडे यशपाल कांबळे निहाल क्षीरसागर नंदकुमार चंदनशिवे आदी पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.




जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आदी.

Read More

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आमरस व पुरणपोळीचा मिष्टान्न भोजन

April 30, 2025 0





सोलापूर : आस्था रोटी बँकेने अक्षय तृतीयानिमित्त सोलापूर शहरात माणुसकीचा सुवास पसरविणारे विविध कार्यक्रम आयोजित केले. प्रारंभी भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रामचंद्र तडवळकर, डॉ जानवी माखीजा, लक्ष्मीकांत बिराजदार यांची उपस्थिती होती.




तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खास आमरस आणि पुरणपोळीच्या मिष्टान्न भोजनाची मेजवानी उभारली गेली. रुग्णांच्या तणावग्रस्त चेहऱ्यांवर समाधानाचा हास्यफुलारा फुलला. "सणाच्या दिवशी घरापासून दूर असूनही, इथे घरचीच ऊब मिळाली," अशा भावना व्यक्त करत भावुक नातेवाईकांनी फाऊंडेशनचे आभार मानले.






या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात, कुमठा नाका रोडवरील भारतमाता नगरीत राहणाऱ्या महिला कुष्ठरोगी वर्गासाठीही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वादिष्ट मिष्टान्न भोजनानंतर, अध्यात्मिक आधार देणाऱ्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन झाले. गवळी वस्तीतले ह. भ. प. अरुंधती महाराज भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय साध्या, रोजच्या जीवनातील उदाहरणांनी स्फुर्ती देणारे कीर्तन सादर केले.





समाजाकडून दूर लोटलेल्या या महिलांना आजवर टीव्हीवरच पाहिलेल्या कीर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्याची इच्छा असूनही शारीरिक व्यंगांमुळे त्यांना हे शक्य झाले नव्हते. मात्र आज, त्यांच्या गुमनाम दुनियेत आनंदाचा दीप उजळला. डोळ्यांत पाणी, ओठांवर हसू आणि मनात कृतज्ञता — असा अनोखा सोहळा या महिलांनी अनुभवला.






आस्था फाऊंडेशनने केलेल्या या उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेमाचा, स्नेहाचा आणि आस्थेचा हात पोहचविला.




कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय छंचुरे, नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, संपदा जोशी, अनिता तालीकोटी, राधा मॅडम, मंगल पांढरे, अविनाश मार्चला, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केले. 




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले, तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले.

Read More

पठाण परिवाराकडून लक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण शुभारंभ

April 30, 2025 0



सोलापूर - इंगळे वस्ती निलम नगर येथील आशा मराठी विद्यालय आणि श्री धर्मण्णा सादूल प्रशालेच्या क्रिडागंण समोरील जागेत पुरातन काळापासून लक्ष्मी मंदिर आहे. याला अवकळा आली होती. शिक्षण समूहाचे संस्थापक हारुण पठाण परिवाराच्या वतीने या मंदिर परिसराचे सुशोभीकरण स्व: खर्चाने करण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर  भूमीपुजन सौ व श्री विष्णू इंगळे सौ व श्री जगदिश मुसळे सौ व श्री भिमा कोरे सौ व श्री चिदानंद निंबाळ या दाम्पत्यांच्या शुभ हस्ते देवीस खणा नारळाची ओटी भरली आणि भूमिपूजन करण्यात आले. तसेच थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.

        




या प्रसंगी आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लिमबानो पठाण, श्री धर्मण्णा सादूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ आफरिन सय्यद मराठा सेवा संघाचे राम गायकवाड आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






पठाण परिवाराकडून हिंदू मंदिर परिसराचे सुशोभीकरण हे बंधुभाव जपणार कार्य आहे. यामुळे धार्मिक एकोपा वाढीस लागेल. श्रध्दास्थान सुशोभीकरण केल्याने एक आत्मिक समाधान मिळेल असे मत हारुण पठाण यांनी व्यक्त केले.





पठाण परिवाराच्या वतीने या पुर्वी ही मातंगी मंदिरा साठी जागा उपलब्ध करून देऊन मंदिराच जिर्णोध्दार केले होते. निलम नगर परिसरातील शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच सहकार्याची भूमिका असते.

Read More

Tuesday, April 29, 2025

ग्रामदैवत हनुमान यात्रा डॉल्बी मुक्त वातावरणात साजरी

April 29, 2025 0

  



सोलापूर - तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहिप्परगा या गावातील ग्रामदैवत हनुमानाची यात्रा दिनांक 25.04.2025 रोजी होती. सदर यात्रेच्या अनुषंगाने दिनांक 24.04.2025 रोजी गावात किर्तन, भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

       





मौजे तळेहिप्परगा येथील ग्रामदैवत हनुमान देवाच्या यात्रेची मिरवणुक पोलीस प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन डॉल्बीचा वापर न करता पांरपांरीक पध्दतीचे वाद्य वापर करून मिरवणुक काढणे बाबत तळेहिप्परगा येथील यात्रा पंच कमिटी यांनी व गावातील ग्रामस्थ यांनी निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे हनुमान देवाची मिरवणुक पांरपारीक पध्दतीच्या वाद्य वापर करून मिरवणुक शांततेत व वेळेत पार पाडली आहे.

      






मौजे तळेहिप्परगा येथील हनुमान यात्रेचा काठीचा मान हा मुस्लीम समाजातील उस्मान शेख याचेकडे तळेहिप्परगा गाव अस्तित्वात झाले पासुन आहे. उस्मान शेख हे नाशिक येथे फरशीच्या दुकानात काम करतात. यात्रे करीता ते नाशिक येथुन एक महिन्या पासुन तळेहिप्परगा येथे थांबुन त्यांनी हनुमानाची काठी सजवुन एकात्मेचे उत्तम उदाहरण घडवुन दिले आहे. सदर यात्रे करीता रतिकांत पाटील, छावा संघटना उत्तर सोलापूर व पंच कमीटी, तळेहिप्परगा याचे सहकार्य लाभले आहे.

       






यात्रा कमिटी मधील सदस्य (1) विट्ठल रेवजे (2) उस्मान शेख (3) तानाजी सुरवसे (4) अभिजित पाटील (5) सुमित सावंत व (6) शशिकांत स्वामी या सर्वांचा दिपक चव्हाण, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर व पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे येथे डॉल्बीमुक्त मिरवणुक पार पाडल्याबद्दल त्यांचा वृक्ष देऊन सत्कार करून त्यांना भविष्यात अशाच प्रकारे उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

       





सणोत्सवा दरम्यान कर्णर्र्कश्य डॉल्बीचा वापर करून हदयरोग, बहिरेपणा, उच्चरक्तदाब या सारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देणा-या मिरवणुका काढणा-या तरूणाईसाठी हा आदर्श घालुन दिला आहे. अशाच मिरवणुका व समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन दिपक चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी केले आहे.  

       





सदर यात्रे मध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणुक शांततेत पार पाडावी या अनुषंगाने मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर, दिपक चव्हाण पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली पोसई/घोडके, सपोफौ/ बानेवाले, पोहवा/नागेश कोणदे व मनोज भंडारी यांनी चोख बंदोबस्त केला आहे. 

Read More

बसवेश्वर जयंती मंगळवेढा येथे शासनस्तरावर भव्य स्वरूपात साजरी करण्यात यावे

April 29, 2025 0


                           


मुंबई - समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेले महात्मा बसवेश्वर यांची जयंती दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी होणार आहे. मंगळवेढा हे त्यांचे कर्मभूमी असून, त्यांनी येथे सलग बारा वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करून समतेचा व लोकशाहीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. या ठिकाणी त्यांची जयंती शासनामार्फत भव्य व शासकीय स्वरूपात साजरी होणे अत्यंत आवश्यक आहे.महाराष्ट्र शासनाने २००१ पासून महात्मा बसवेश्वर यांचा महापुरुषांमध्ये समावेश केल्याने सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. तसेच, शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १८ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक संस्थांमध्ये जयंती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.                    






मंगळवेढा येथील समता भूमी (राष्ट्रीय स्मारक) येथे हा उत्सव व्यापक स्वरूपात व भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.या अनुषंगाने, महात्मा बसवेश्वर जयंती २०२५ मंगळवेढा येथे भव्य स्वरूपात साजरी यावे अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी मुंबई येथील टिळक भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी केली असता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच माजी मंत्री जन स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे (सावकार) व सोलापूर लोकसभाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा शासनाकडे मागणी केली आहे.                              





यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले  शासकीय उपक्रमामुळे लिंगायत समाजाच्या भावनांचा सन्मान होईल, सामाजिक ऐक्य बळकट होईल आणि महात्मा बसवेश्वर यांच्या समतावादी विचारांचा प्रसार होईल. तसेच, मंगळवेढा येथील समता भूमीचे राष्ट्रीय स्मारक म्हणून महत्त्व अधोरेखित होईल.आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रस्तावित कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्देश द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केले आहे.                          





जागतिक लिंगायत महासभेचे वतीने प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव व मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

Monday, April 28, 2025

पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना अध्यक्षपदी सिद्धाराम मोटे

April 28, 2025 0


सोलापूर - पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना भवानी पेठ मड्डी वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी नियोजन बैठक आयोजित करण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मिटिंग प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 






यावेळी भाजपा चे माजी नगरसेवक तथा सभागृह नेते सुरेश पाटील, संघटनेचे संस्थापक अर्जुन पांढरे, संघटनेचे अध्यक्ष हनुमंत रुपनर, जगदेव बंडगर, बसवराज रुपनर, सुभाष सोनकर, धरेप्पा मोटे, सुरेश काले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भैय्या सरवदे, गुरु कावडे, अशोक कोळेकर, शंकर बंडगर, लक्ष्मण विटकर, सिद्ध निशाणदार, अभिषेक भाईकट्टी, यशवंत सलगर, अवी भोळे आदींची उपस्थिती होती. 

        





याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आले. पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना, भवानी पेठ, मड्डी वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती यंदाच्या त्रिशताब्दी वर्ष आणि संघटनेचे सुवर्ण वर्ष असल्याने जयंती मोठ्या उत्साहाने करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

       






यावेळी माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी म्हणाले की, मी आज पर्यंत जे काही नाव कमवले ते फक्त अहिल्यादेवी हीतवर्तक संघटना मुळेच कमवले आहे. त्यासोबतच अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या परिक्रमाची माहिती दिले.

           





या बैठकीत संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उत्सव अध्यक्ष सिद्धाराम मोटे, उपाध्यक्ष ओमकार भिसे, आनंद इंरडगी, कार्याध्यक्ष उमेश वायकोळे खजिनदार सचिन सोनकर, सह खजिनदार प्रकाश दहिवडे, सेक्रेटरी काशीराम मोठे, सहसेक्रेटरी अमोल बंडगर, पूजा प्रमुख हनुमंत वडरे, रेवण मोठे, सोशल मीडिया प्रमुख समर्थ बनणे, स्वप्निल मोठे, शिवराज केलुरे, मिरवणूक प्रमुख राम खांडेकर, शुभम दुधाने, रवी सलगर, कुमार नागराळे, अनिल तळेकर सचिन बंडगर, सचिव सतीश वडनूर, सहसचिव गणेश बंडगर, सुवर्ण महोत्सव सल्लागार समिती दत्ता पांढरे, महेश ठोंबरे, रंगनाथ हक्के, माळप्पा रेल्वे, यल्लाप्पा पुजारी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश काळे, अजय रुपनर आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आले.

Read More

रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्यांना Reflective Belts चे वाटप... प्राण्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

April 28, 2025 0




सोलापूर – स्वराज संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेला "दीपबंधन" उपक्रम सोलापूर शहरातील प्राणिमित्रांच्या मनाचा ठाव घेत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर फिरणाऱ्या कुत्र्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी Reflective Belts लावण्याचा हा उपक्रम आहे.






"दीपबंधन" हे केवळ एका उपक्रमाचे नाव नाही, तर माणसाचा मुक्या जीवांशी जोडलेल्या प्रेमाच्या आणि जबाबदारीच्या नात्याचे प्रतीक आहे.  






वाहनांच्या प्रकाशात चमकणारे हे Reflective Belts रात्रीच्या वेळी कुत्रे सहज दिसण्यास मदत करतात आणि त्यांच्यावर तसेच वाहनचालकांवर होणाऱ्या अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी करतात.






"आपण जसे आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, तसेच या मुक्या जीवांचीही आपलेपणाने काळजी घ्यायला हवी," असे मत स्वराज संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्वराली सुधा रविंद्र भोसले यांनी व्यक्त केले.






या उपक्रमात स्वराज संस्थेच्या सदस्यांनी मिळून एकूण १३० Reflective Belts कुत्र्यांना लावले, ज्यामुळे रस्त्यांवरील त्यांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडली आहे.






सोलापूरकरांकडून या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत असून, "दीपबंधन" हे शहरातील सकारात्मक बदलाचे प्रतीक ठरत आहे, जिथे प्रेम, जबाबदारी आणि करुणा यांचा सुंदर संगम आहे.






उपक्रमात सहभागी सदस्य:  स्वराली सुधा रविंद्र भोसले, निरंजन कुलकर्णी, व्यंकटेश इटेकर, दिपा नारायणकर, ऋतुजा कमले, मयूरेश गवळी, अर्णव कुलकर्णी, दिपक पांडे, महेश प्रधाने, पार्थ भोसले, आकाश कोठाडिया, मनिष परदेशी, मयुर बनसोडे, चैतन्य शेटे, आदिती भोसले, मुद्दिता वाघमारे, श्रद्धा गाडेकर, दिपा स्वामी, कुणाल जैन, श्रेयस राऊत, प्रथमेश ओहोळ, अभिषेक कुलकर्णी, उत्कर्ष उंबरजे, मनस्वी, आकांक्षा, राहुल इत्यादी.

Read More

Saturday, April 26, 2025

छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाने दिले आयुक्तांना निवेदन

April 26, 2025 0





सोलापूर - शिवपुत्र छत्रपती सांभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांचा सत्कार करण्यात आला आणि जयंती निमित्त विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.





१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून ११ मे पर्यंत छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसरात भव्य मंडप मारण्यात यावे. संपूर्ण परिसरात LED लाईट आणि फोकस लावण्यात यावेत.






छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसर फुलाने सजावट करण्यात यावे अशी मागणी मध्यवर्ती महामंडळ संस्थापकअध्यक्ष राम जाधव आणि उत्सव अध्यक्ष निशांत सावळे यांनी केली. तत्काळ आयुक्त ओम्बासे यांनी निवेदनाची दखल घेऊन अधिकाऱ्यांना काम करून घेण्यास सूचना दिल्या.





यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उत्सव कार्याध्यक्ष विरेश कलशेट्टी, उपाध्यक्ष सॅम पतंगे, विश्वस्त पवन आलुरे, राजाभाऊ गेजगे, हरीभाऊ सावंत, संदीप चेळेकर आदी जण उपस्थित होते

Read More

Friday, April 25, 2025

सोलापूरातील विविध प्रश्न मार्गी लावा... पालकमंत्र्याकडे मागणी

April 25, 2025 0

 




सोलापूर - सोलापूर शहरातील अनेक विविध प्रश्न राजकीय अनास्था मुळे व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे करोड रुपये खर्च करून अनेक कामांची दुरवस्था झालेली असून  सर्वसामान्य जनतेचे करोडो रुपये  वाया गेलेले दिसून येत आहे त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून महानगरपालिका प्रशासन व अधिकाऱ्यांना समज देण्यात यावी व सोलापुरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः जातीने लक्ष द्यावे असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटून देण्यात आले 

 





सोलापूर शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण केंद्र गेल्या पाच सहा वर्षांपासून बंद आहे त्यामुळे अनेक जलतरुपटूंची गैरसोय होत आहे फक्त वीस-पंचवीस लाखांमध्ये हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव दुरुस्त होऊ शकतो पण जिल्हा क्रीडा अधिकारी मनावर घेत नाहीत त्यांना याबाबत समज देण्यात यावी. 


2) सोलापूर शहरातील करोड रुपये खर्चून एडवेंचर पार्क सिद्धेश्वर मंदिरातील लेझर शो तसेच सोलापूर शहरातील सर्व उद्याने बंद आहेत तसेच सोलापुरातील प्राणी संग्रहालय सुद्धा बंद आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनास याबाबत समज देण्यात यावी. 

3) जुळे सोलापूर भागातील  आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाचे काम 2022 पासून नितीन गडकरी साहेबांनी निधी देऊन सुद्धा जल वहिनी काढण्यासाठी तीन वर्षापासून प्रलंबित आहे याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना आदेश देण्यात यावे.

4) सोलापूर विमानसेवा तातडीने सुरू करण्यात यावी सोलापूर विमान तळास छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्यात यावे .

5) उजनी समांतर जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावेत तसेच सोलापूर शहरात उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो पण सोलापूर महानगरपालिकेचे वतीने जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये व्यवस्थित जल शुद्धीकरण केले जात नाही काही मशनेरी बंद आहेत त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्यामुळे सोलापुरात अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत याबाबत शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यास आदेश द्यावेत.

6) छत्रपती शिवाजी महाराज सर्वपचार रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन अनेक दिवसापासून बंद आहे सिटीस्कॅन मशीन सोलापुरा उपलब्ध होऊन सुद्धा अद्याप ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही ते तातडीने सुरू करण्याचे आदेश अधिष्ठाता यांना देण्यात यावे.

7) सोलापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने अतिक्रमण संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी माननीय आयुक्त साहेब यांना आदेश व्हावेत.

8)सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारमेश्वर यांच्या प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेल्या आहे ते शौचालय तिथून हटवून इतर जागी हलवावेत ही तमाम सोलापूरकर वासियांची भावना असून त्या भावनेचा आदर राखून तेथील शौचालय बंद करण्यात यावे

9) शासनाच्या विविध योजनांसाठी बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी तातडीने सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शासकीय योजनेसाठी कर्ज देण्यासाठी बँकेला आदेश द्यावेत.

10) सोलापूर शहरांमध्ये मोठे उद्योगधंदे येण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न व्हावा .

11) काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला आहे पावसाळ्याची शक्यता गृहीत धरून सोलापूर शहरातील सर्व नालेसफाई चे कामे तातडीने करण्यात यावेत यासाठी निधी  मंजूर करावा. 

सोलापुरातील बंद पडलेली परिवहन सेवा पुनश्च तातडीने सुरू करण्याची यावी. या मागण्या निवेदनात करण्यात आल्या. 





यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे शहर सचिव सिद्धाराम साबळे शहर संघटक शेखर कंकर जिल्हा संघटक दिलीप निंबाळकर शहर संघटक राजशेखर स्वामी आधी उपस्थित होते

Read More

Thursday, April 24, 2025

छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निशांत सावळे

April 24, 2025 0



सोलापूर - शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निशांत सावळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवपुत्र संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुरारजी पेठ येथील हिंदवी स्वराज्य भवनात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयघोष करून बैठकीला सुरुवात करण्यात आली.

    





१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. या निमित्ताने मध्यवर्ती महामंडळाच्या अधिपत्याखाली मिरवणुका निघणार आहेत .सोलापूर शहरातील मंडळांना येणाऱ्या अडचणी संदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. पारंपारिक वाद्य आणि डॉल्बी संदर्भात प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मंडळाला येणाऱ्या अडचणी संदर्भात संपर्क साधण्याचे आवाहन शिवपुत्र संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी केले आहे.

  





अठरापगड जातींना सोबत घेऊन सोलापुरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे .या माध्यमातून संभाजी महाराजांचे कर्तृत्व आणि विचार पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सोलापुरातील मंडळांनी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना संभाजी महाराजांच्या इतिहासाला चित्र आणि देखाव्याच्या माध्यमातून प्राधान्य द्यावे ,असे आवाहन नूतन उत्सव अध्यक्ष निशांत सावळे यांनी केले आहे.

 




उत्सव अध्यक्षपदी निशांत सावळे, कार्याध्यक्षपदी वीरेश कलशेट्टी आणि उपाध्यक्षपदी सागर गायकवाड आणि सॅम पतंगे यांची निवड करण्यात आली.

  




यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त राजाभाऊ गेजगे, पवन आलुरे, हरिभाऊ सावंत, नागेश भोसले आणि राहुल दहीहंडे उपस्थित होते.

Read More

Wednesday, April 23, 2025

अंकोलीच्या श्री भैरवनाथाचा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा... भैरवनाथाच्या नावानं चांगभलं चा जयघोष

April 23, 2025 0

 



सोलापूर - हजारो भक्तगणांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ यात्रा (ता. मोहोळ) उत्सव मोठ्या भक्तीमय व धार्मिक वातावरणा पार पडला. 20 ते 23 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या यात्रास उत्सवा देवाचा विवाह सोहळा, कावडींसह पालखी, छबिना व शोभेचे दारूकाम असे कार्यक्रम झाले असल्याचे मंदीर समितीच्यावतीने सांगण्यात आले.






श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ हे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारों भक्तगणांचे कुलदैवत आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात श्री भैरवनाथ यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्यावर्षी हा यात्रा उत्सव 20 ते 23 एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ यात्रेत 20 एप्रिल रोजी रात्री 10 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत श्री जागर होऊन पहाटे 5 वाजता श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळ्यातील अक्षदा पार पडल्ाय. त्यानंतर महाआरती झाली. 








21 एप्रिल रोजी सोमवारी गावकऱ्यांची अष्टमी दिवशी नाल बसवणे तसेच दुपारी 4 वाजता मानाच्या कावडींसह आरत्या निघाल्या. रात्री सवाद्य पालखी छबिना निघाला. 21, 22 आणि 23 एप्रिल या तिन्ही दिवशी पालखी छबिना निघाला. यावेळी यात्रेसाठी आलेल्या हजारो भक्तगाणांनी पालखीला खांदा देत कावडी नाचविल्या. बुधवारी 23 एप्रिल रोजी पालखी छबिना सोहळ्यात शोभेचे दारूकाम होऊन यात्रेचा समारोप झाला. या यात्रा उत्सवासाठी मंदीर समिती तसेच गावकऱ्यांकडून येणाऱ्या भक्तगणांच्या सोयी-सुविधांसाठी परिश्रम घेण्यात आले.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot